प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या सरकारी चहापानावर विरोधी भाजपने सांगून बहिष्कार घातला, पण मुख्यमंत्र्यांनी न बोलता दांडी मारली…!!Maharashtra Legislative Convention: Opposition boycotts government tea party; Dandi without speaking to the Chief Minister
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर मनी लॉंड्रिंग केलेल्या प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आग्रही आहे. इतकेच नाही तर मराठा आरक्षणापासून ऑफिस यार क्षणापर्यंत अनेक मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारचे वाभाडे विरोधकांनी काढले आहेत.
या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारचा चहापानावर बहिष्कार घालणार असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी जाहीर केले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी विरोधक बहिष्कार घालणार असल्याचे आम्हाला माहिती आहे, असे सांगितले होते. त्यानुसार विरोधकांचा बहिष्कार हा बोलून होता, पण सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या आजचा चहापानात उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न बोलताच अनुपस्थित होते.
त्यामुळे राजकीय वर्तुळात विरोधकांचा बोलका बहिष्कार आणि मुख्यमंत्र्यांची न बोलून दांडी!!, हा विषय जोरदार चर्चेचा ठरला आहे. विधिमंडळ अधिवेशनात तरी मुख्यमंत्री किती वेळ उपस्थित राहतील?, याविषयी यामुळे शंका व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Legislative Convention: Opposition boycotts government tea party; Dandi without speaking to the Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- Nawab Malik ED : नवाब मलिकांचा पाय खोलात; बीकेसीत आढळला 200 कोटींचा भूखंड; उच्च न्यायालयानेही दिला दणका!!
- INDIA-POLAND : जगाने नाकारलं मात्र भारताने स्वीकारलं ! पोलंडला राजाश्रय देणारं संस्थान कोल्हापूर ! दुसऱ्या महायुद्धात पोलंडवासीय पाच वर्ष कोल्हापूरात… गातात वंदे मातरम्
- Nawab Malik ED : नवाब मलिक यांचा मुलगा फराजच्या कंपनीचा बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 200 कोटींचा भूखंड; ईडीकडून चौकशी!!
- आरक्षण आणि भरमसाठ देणग्यांमुळे माझ्या मुलाला युक्रेनला जावे लागले; युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या नवीनच्या वडिलांची व्यथा