राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. सन 2020-21 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 13.92 टक्के वाढ झाल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली.Maharashtra govt’s revenue rises by 13.92 per cent to Rs 17,000 crore in 2021-22
वृत्तसंस्था
मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 या आर्थिक वर्षात 17177.19 कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. विभागाने सन 2020-21 यावर्षी 15078.25 कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. सन 2020-21 यावर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 13.92 टक्के वाढ झाल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली.
असे आहे उत्पादन शुल्क विभागाचे कार्य
राज्य उत्पादन शुल्क विभाग राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री इ. अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी करून नियमन करणे, मद्यावरील कर गोळा करणे इ. कार्य प्रामुख्याने करीत असतो. तसेच राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक, बनावट मद्य, परराज्यातून होणारी अवैध मद्याची तस्करी इ. विरुध्द सज्ज राहून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याचे उच्चाटन व नियंत्रणाचे कामकाज करीत असतो.
अवैध धंद्यांची कशी करता येते तक्रार?
अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रारींसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष कायम कार्यरत असतो. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. तक्रार नोंदविण्यासाठी ०२२-२२६६०१५२ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा ८४२२००११३३ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे stateexcise.controlroom@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क करता येतो.
Maharashtra govt’s revenue rises by 13.92 per cent to Rs 17,000 crore in 2021-22
महत्त्वाच्या बातम्या
- Elon Musk Twitter : एलन मस्क यांची ट्विटरला ४३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची ऑफर, ट्विटरच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ
- “पेंग्विन”, “म्याऊ म्याऊ”, “कोंबडा” झाले; महाराष्ट्राचे राजकारण आता “नागाचा फणा”, “कोंबडी”, “म्हशी”वर उतरले!!
- पाॅलीसीच्या बहाण्याने साडेनऊ लाखांची फसवणुक
- आलिया रणबीरच्या अखेर लग्नबंधनात