• Download App
    महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली, भाजीपाला, बेकरीला आता चार तासांचाच वेळ Maharashtra govt. declares new rules of lockdown

    महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली, भाजीपाला, बेकरीला आता चार तासांचाच वेळ

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – महाराष्ट्रात रस्त्यावरील गर्दीला ब्रेक लावण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार किराणा, भाजीपाला-फळे, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी ७ पासून ११ वाजेपर्यंत उघडी राहतील. २० एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत नवे निर्बंध लागू राहतील. संबंधित दुकानांमधून सकाळी ७ पासून रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा देता येणार आहे. Maharashtra govt. declares new rules of lockdown

    नव्या नियमावलीनुसार चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी यांसह कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्य, पावसाच्या हंगामासाठीचे साहित्य (वैयक्तिक व संघटनात्मक) इत्यादी दुकाने सकाळी ७ पासून ११ पर्यंत सुरू राहतील.



    अशी आहे नवी नियमावली

    • किराणा, भाजीपाला, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व खाद्यपदार्थ (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडीसह), कृषी अवजारे व उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्य, पावसाच्या हंगामासाठी साहित्य आदी दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू राहतील.

    • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास ते कलम दोनअंतर्गत काही गोष्टींना व सेवांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते.

    Maharashtra govt. declares new rules of lockdown


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस