प्रतिनिधी
मुंबई : भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी अनेक समाजसुधारक, लेखक, कवी, राजकीय नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांचे मोठे योगदान आहे. त्यात क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांचे महत्वाचे योगदान आहे. वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. Maharashtra government will celebrate savarkar jayanti as swatantryaveer gaurav day
त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा विचार करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करून, विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करून साजरा करावा, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. या संदर्भातील निवेदन सुद्धा सामंत यांनी दिले होते. यानुसार आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस राज्य शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असून यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
राहुल गांधींनी वीर सावरकरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली तसेच उदय सामंत यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित वीर सावरकरांचा जन्मदिवस ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करावा अशी मागणी केली होती. यानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra government will celebrate savarkar jayanti as swatantryaveer gaurav day
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी – तृणमूळ – कम्युनिस्ट : संकुचित दृष्टी, आकुंचित पक्ष; राष्ट्रीय दर्जापासून ढळले नेतृत्व!!
- कर्नाटक भाजपकडून स्टार कँपेनर्सच्या डिमांडमध्ये योगी, जयशंकर, हेमंत विश्वशर्मा टॉपवर; जयशंकर तर सरप्राईज एलिमेंट!!
- पवार, ममतांचा गेला राष्ट्रीय दर्जा; काँग्रेससाठी आले आनंदाचे भरते
- मुलींसाठी वरदान ठरलेल्या सुकन्या समृद्धी योजनेतून अधिक लाभ मिळणार; मोदी सरकारने वाढवला व्याज दर!