• Download App
    Maharashtra Flood : माणुसकी : पूरग्रस्त भागात दररोज 15,000 थाळ्या पुरवणार मास्टरशेफ संजीव कपूर ! कोरोना योद्धयांना देखील पुरवल्या 10 लाख थाळ्या। Maharashtra Flood: Humanity: Master Chef Sanjeev Kapoor to provide 15,000 plates daily in flood-hit areas! Corona also provided 10 lakh plates to the warriors

    Maharashtra Flood : माणुसकी : पूरग्रस्त भागात दररोज १५,००० थाळ्या पुरवणार मास्टरशेफ संजीव कपूर ! कोरोना योद्धयांना देखील पुरवल्या १० लाख थाळ्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात पावसाने कहर केला आणि यातूनच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले . अनेक भागात पुराचं पाणी गेल्याने मोठं नुकसान झालं . मदतीचा ओघ सुरु असताना आता पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून टीम संजीव कपूर आजपासून पूरग्रस्तांना दररोज 15,000 थाळी पुरवणार आहेत. Maharashtra Flood: Humanity: Master Chef Sanjeev Kapoor to provide 15,000 plates daily in flood-hit areas! Corona also provided 10 lakh plates to the warriors

    माणुसकी

    पद्मश्री संजीव कपूर म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले तर अनेकांनी घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊल अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबियांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.’



    10 लाख थाळी

    कोरोनाने संपूर्ण देशाला विळखा घातला असताना, मास्टरशेफ संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने कोरोना विषाणूविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत.

    आतापर्यंत शेफ कपूर आणि वर्ल्ड सेंट्रल किचनचे शेफ जोस अँड्रेस यांनी दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, लखनौ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी १० लाखाहून अधिक थाळी जेवण पुरवले आहे.

    Maharashtra Flood: Humanity: Master Chef Sanjeev Kapoor to provide 15,000 plates daily in flood-hit areas! Corona also provided 10 lakh plates to the warriors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!