Maharashtra chief minister uddhav thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) शुक्रवारी ही माहिती दिली. रुग्णालयातील डॉक्टर अजित देसाई आणि शेखर भोजराज यांचा हवाला देत सीएमओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांना शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की शस्त्रक्रियेदरम्यान ते स्थिर होते आणि आता ते बरे आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे. Maharashtra chief minister uddhav thackeray undergoes spinal surgery
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) शुक्रवारी ही माहिती दिली. रुग्णालयातील डॉक्टर अजित देसाई आणि शेखर भोजराज यांचा हवाला देत सीएमओने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांना शस्त्रक्रियेनंतर वॉर्डात आणण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की शस्त्रक्रियेदरम्यान ते स्थिर होते आणि आता ते बरे आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.
देसाई हे हृदयरोगतज्ज्ञ आहेत, तर डॉ. भोजराज हे स्पाइनल सर्जन आहेत. मानेचे दुखणे वाढू लागल्याने ठाकरे यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आठवड्यात ते एका कार्यक्रमात ‘सर्विकल कॉलर’ घातलेले दिसून आले होते.
काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नव्हती
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानेच्या आणि मणक्याच्या त्रासामुळे अनेक कार्यक्रम रद्द केले होते. त्यांनी लोकांशी भेटणेही कमी केले होते. दिवाळीच्या दिवशी त्यांच्या वर्षा बंगल्यावर जाणाऱ्यांनाही ते क्वचितच भेटले. मुख्यमंत्र्यांना वेदना वाढल्याने त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व्हायकल कॉलर घातलेले दिसले. या कार्यक्रमात 11 हजार कोटी खर्चाच्या पंढरपूरमधील दोन महामार्गांच्या विस्तारीकरणाची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेत सर्व्हिकल कॉलर लावून सामील झाले होते.
Maharashtra chief minister uddhav thackeray undergoes spinal surgery
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर खेरी हिंसाचार : SIT तपासावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने यूपी सरकारला सुचवली दोन नावे, सोमवारपर्यंत निर्णय घेण्याची मुदत
- हिंदुत्व म्हणजे मुसलमान – शिखांना मारणे!!; राहुल गांधींनी केला हिंदुत्वावर नवा आरोप
- झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले, त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, रुपाली चाकणकरांचा घणाघात
- PAK vs AUS : सेमीफायनलच्या आधी दोन रात्री मोहम्मद रिझवान आयसीयूमध्ये होता, पाकचे फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांचा खुलासा
- ‘आपलं म्हणायचं आणि घात करायचा ‘ ; कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून पडळकरांनी टोला लगावला