• Download App
    Maharashtra Budget : सारे काही महिलांसाठी... एसटीत ५० टक्के सवलत, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात घसघशीत वाढ अन् खास महिलांसाठी विविध क्लस्टर्स|Maharashtra Budget : Everything for Women... 50% concession in ST travel and big hike for ASHA & Anganwadi sisters

    Maharashtra Budget : सारे काही महिलांसाठी… एसटीत ५० टक्के सवलत, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात घसघशीत वाढ अन् खास महिलांसाठी विविध क्लस्टर्स

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी विविध घोषणा करताना काहीही हातचे राखून ठेवले नसल्याचे दिसत आहे. वाचा त्यांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा…Maharashtra Budget : Everything for Women… 50% concession in ST travel and big hike for ASHA & Anganwadi sisters

    •  राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
    • चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
    •  महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
    •  कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
    •  मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
    •  महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
    •  माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार


     

    मानधनात भरीव वाढ

    • आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
    •  गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
    •  अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
    •  मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
    •  अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
    •  अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
    • अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

    नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे

    • शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
    • अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे

    एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना

    • या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
    •  या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार

    Maharashtra Budget : Everything for Women… 50% concession in ST travel and big hike for ASHA & Anganwadi sisters

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!

    समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    पुरोहित संघातील 38 वर्षांची मक्तेदारी संपली, अध्यक्ष पदावरून सतीश शुक्लांची हकालपट्टी; चंद्रशेखर पंचाक्षरींकडे जबाबदारी; आता गोदावरी आरतीचा वाद संपण्याची अपेक्षा!!