प्रतिनिधी
मुंबई : महा विकास आघाडी सरकारच्या 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव केंद्र सरकारपूढे ठेवला आहे. या प्रस्तावावर लगेच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या मुंबई भेटीचा हा परिणाम आहे का…?? अशीही चर्चा रंगली आहे.Maharashtra Budget 2022: Mumbai – Hyderabad Bullet Train Proposal; KCR – Result of Uddhav Thackeray meeting …
केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध प्रादेशिक पक्षांची आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नातून चंद्रशेखर राव यांनी मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये प्रस्तावित आघाडी विषयी चर्चा देखील झाली होती. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत दोन्ही मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात माहिती देखील दिली होती. या पार्श्वभूमीवरच मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे का…??, असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत त्याच केसीआर – उद्धव ठाकरे भेटीचा उल्लेख केला आहे. एकीकडे ठाकरे – पवार सरकारने मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले फक्त 20 % काम अर्धवट ठेवले आहे. ते अर्धवट ठेवून मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव ठेवण्यात येतो आहे.
या मुद्द्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी बोट ठेवले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे 20 % काम देखील करायचे नाही आणि चंद्रशेखर राव यांना भेटायला जाण्यासाठी मुंबईतून हैदराबादला बुलेट ट्रेन सोडायची, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे 80 % काम गुजरात प्रदेशात आहे. ते काम पूर्णत्वास पोहोचले आहे. उरलेले फक्त 20 % काम महाराष्ट्राच्या हद्दीत येते. मात्र भूसंपादनापासून प्रत्यक्ष ट्रॅक टाकण्यापर्यंत असे सर्वच काम अर्धवट राहिले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन या विषयावर महाराष्ट्रात मोठा राजकीय वादंग उभा राहणार आहे.
Maharashtra Budget 2022: Mumbai – Hyderabad Bullet Train Proposal; KCR – Result of Uddhav Thackeray meeting …
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदुत्वाच्या झंझावतात एमआयएमचा पालापाचोळा, १०० पैकी ९९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त ; सर्व उमेदवार पराभूत
- टीईटी-२०१८च्या परीक्षेत १७०० अपात्र परीक्षार्थी केले पात्र प्रत्येकी ५० हजार ते एक लाख रुपये स्विकारुन काेटयावधींचा गैरव्यवहार
- इसिसशी संबंधित संशयिताला पुण्यातून अटक, संवेदनशील इलेक्ट्रॉनिक वस्तूसह कागपत्रही जप्त
- राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी सेवापुस्तकात बनावट नोंदी; पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यासह लिपिकावर गुन्हे