वृत्तसंस्था
मुंबई : महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद हा शुद्ध ढोंगीपणाचा कळस आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उत्तर प्रदेशमधील लाखीमपूर घटनेवर राज्यात बंद पुकारणे चुकीचे आहे, असे टीकास्त्र भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.Maharashtra Bandh is the pure hypocrisy of Mahavikas Aghadi; BJP leader Devendra Fadnavis Allegations
महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काहीच मदत केली नाही. या उलट लाखीमपूर घटनेवर राज्य बंद करून काय साध्य होणार आहे, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.
महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे.
राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बांधावर जाऊन २५ आणि ५० हजाराची मदत करणे किंवा कर्जमाफी दिली जाईल, अश्या घोषणा या हवेत विरल्या आहेत. वेगवेगळ्या आपत्तीत मदत केली नाही. केली ती सुद्धा तोकडीच होती. त्यांच्या घटक पक्षाने देखील मदत कमी असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप सरकारने चांगली मदत केल्याचे म्हंटले होते.
ते म्हणाले, आंदोलन म्हणजे ढोंगीपणा आहे. कारण पुण्यात पाणी मागणाऱ्या मावळ येथील शेतकऱ्यांवर काँग्रेस आघाडी सरकारने गोळीबार केला होता. आता तीच मंडळी शेतकरी मुद्यावर आंदोलन करत असून त्यांना आंदोलन करण्याची नैतिकता नाही.
लाखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार दोषींवर कारवाई करत आहे. पण, या मुद्यावर संवेदना व्यक्त करण्याऐवजी त्यावर राजकीय पोळी भाजता येईल का, याचा विचार करून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
- महाराष्ट्र बंद हा महाविकास आघाडीचा ढोंगीपणा
- राज्यातील शेतकऱ्यांना कवडीची मदत नाही
- बांधावर दिलेली आश्वासने वाऱ्यावर सोडली
- राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
- शेतकऱ्यांना आपत्तीत दमडीची मदत दिली नाही
- मावळच्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणारे हेच होते
- गोळ्या झाडणारी मंडळीच आंदोलन करत आहेत
- काँग्रेस आघाडीला आंदोलन करण्याची नैतिकता नाही
- राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलनाचे ढोंग
Maharashtra Bandh is the pure hypocrisy of Mahavikas Aghadi; BJP leader Devendra Fadnavis Allegations
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू