• Download App
    आज राज्यात महाराष्ट्र बंद ची हाक ; महविकास आघाडीची जोरदार तयारी , या सेवांवर होणार 'बंद' चा परिणामMaharashtra band call in the state today; Strong preparation of Mahavikas Aghadi, 'closure' will affect these services

    आज राज्यात महाराष्ट्र बंद ची हाक ; महविकास आघाडीची जोरदार तयारी , या सेवांवर होणार ‘बंद’ चा परिणाम

    महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदनंतरही मुंबई, ठाणे व पुण्यातील व्यापारी, दुकानदारांनी दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.Maharashtra band call in the state today; Strong preparation of Mahavikas Aghadi, ‘closure’ will affect these services


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकर्‍यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी (आज) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. हे सरकार राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगण्यात आलं.तसेच या बंदमध्ये राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

    हा बंद लोकशाही मार्गाने व्हावा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच लॉकडाऊनमध्ये आधीच पिचलेल्या सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने नवी मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.



    तसेच या बंदवर सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे काही नागरीक शेतकऱ्यांवर गाडी चालवणाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण आधीच कोरोनामुळे बंदचा फटका बसल्याने सरकारच्या बंदला नकार देत आहेत.

    दुकानदार, व्यापार्‍यांनी आघाडीच्या आवाहनाला भीक घालू नये. जर कोणी दंडेलशाही करून दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर भाजप रस्त्यावर उतरून दुकानदार, व्यापार्‍यांना संरक्षण देईल, अशी हमी त्यांनी दिली.

    महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदनंतरही मुंबई, ठाणे व पुण्यातील व्यापारी, दुकानदारांनी दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा शेतकर्‍यांना पाठिंबा आहे. मात्र या बंदमध्ये आम्हाला खेचू नका, असे आवाहन राज्यातील व्यापार्‍यांनी केले आहे.

    Maharashtra band call in the state today; Strong preparation of Mahavikas Aghadi, ‘closure’ will affect these services

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस