• Download App
    Maha Vikas Aghadi to be implemented in Goa too; Shiv Sena MP Sanjay Raut's explanation

    गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग राबवणार, खासदार संजय राऊतांचे स्पष्टीकरण; २० जागा लढविणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये २० जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार सुरु आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गोव्यामध्येही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरु आहेत, असेही त्यांनी सांगितले. Maha Vikas Aghadi to be implemented in Goa too; Shiv Sena MP Sanjay Raut’s explanation

    खासदार संजय राऊत म्हणाले की, “गोव्यामध्ये महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार सुरु आहे. त्याला कितपत यश येईल हे आताच सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या ठिकाणच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.”

    उत्तर प्रदेशातील लखनऊ शिवसेना प्रदेश कार्यालयाने ४०३ जागांवर निवडणुका लढण्याचं जाहीर केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये देखील ८० ते ९० जागा लढविण्याचा विचार सुरु आहे. काही शेतकरी संघटनांनी सांगितले की तुम्ही निवडणूक लढा, आमचा पाठिंबा आहे. इतर लहान पक्षांना देखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे.”

    चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर चौकात जरी थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, अशा शब्दांत सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यांने आपल्याकडे भावना व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटलांच्या या दाव्यावर संजय राऊत म्हणाले की, “असा हवेत गोळीबार करून चालत नाही. कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत. चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील, ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात. पण मी वारंवार हेच सांगतो की, हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल.”

    Maha Vikas Aghadi to be implemented in Goa too; Shiv Sena MP Sanjay Raut’s explanation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस