वृत्तसंस्था
पुणे : महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 मेच्या सकाळी सात वाजेपर्यंत आहे. त्यानंतर लॉकडाऊन संपणार की वाढणार? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे.Lockdown Again: Will Lockdown increase in Maharashtra? ;Dr. Find out the opinion of Shashank Joshi
कारण रूग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे आणखी लॉकडाऊन 15 दिवस तरी असण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही हेच मत नुकतेच व्यक्त केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका देशाला बसला आहे. राज्यात लॉकडाऊन 14 एप्रिलपासून लावला असला तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी, जमावबंदी, मिनी लॉकडाऊन या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या. तरीही कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.
दुसरी लाट वेगळी का ठरते आहे?
महाराष्ट्रात लॉकडाऊन उघडता येणार नाही. 13 ते 14 जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र, राज्यावरचे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. आणखी किमान 15 दिवसांचे निर्बंध हे असतील असं मला वाटतं. त्याबाबत आता सरकार विचार करून निर्णय घेईल,असे ते म्हणाले.
केंद्र सरकारने राज्यांसाठी नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्या पाहता राज्यात लॉकडाऊन वाढवावा लागणार अशी परीस्थिती असल्याचे ते म्हणाले. या बाबी केंद्राने स्पष्ट केल्या आहेत.
या निकषांमध्ये महाराष्ट्रातले अनेक जिल्हे येतील त्यामुळे तूर्तास तरी 1 मे रोजी सकाळी लॉकडाऊन संपेल किंवा निर्बंध शिथील होतील याची शक्यता नाही. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर 15 दिवसांचा लॉकडाऊन करावाच लागणार आहे.
केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स काय सांगतात?
- जिल्ह्यांचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट आठवड्यापेक्षा १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिथे लॉकडाऊन लावावा.
- ऑक्सिजन किंवा आयसीयू बेडचं प्रमाण 60 टक्के किंवा त्यावरचं असेल तर तिथे लॉकडाऊन लावावा
- मायक्रो कंटेन्मेंट झोनवर जास्त लक्ष केंद्रीत करावे.
Lockdown Again: Will Lockdown increase in Maharashtra? ;Dr. Find out the opinion of Shashank Joshi
महत्त्वाच्या बातम्या
- शिवसेनच्या आमदार- खासदार झाले व्याही, पण सरकारच्या नियमावलीचा केला भंग
- विस्तारा विमान कंपनीचा कोरोनाविरुध्दचा लढा, डॉक्टर- नर्सना मोफत प्रवासाची सुविधा
- थायलंडच्या पंतप्रधानांना मास्क घातला नाही म्हणून १४,२७० रुपये दंड, गव्हर्नरनेच केली होती तक्रार
- पाच लाखांहून अधिक जणांना लस , महाराष्ट्राची एका दिवसातील विक्रमी कामगिरी ; आता दीड कोटींचा टप्पा गाठणा