Saturday, 10 May 2025
  • Download App
    Local elections are still shaky, but the discussion is on Adhalrao Patil and Dr. Amol Kolhe

    Shivsena – NCP : स्थानिक निवडणुकाच अजून डळमळीत, पण चर्चा आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हेंच्या राजकीय भवितव्याची!!

    सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारला चपराक हाणल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून डळमळीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्याच्या मार्गदर्शन घेण्यासाठी मुंबई हायकोर्टाचे मुख्य  न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांना भेटायला गेले होते. तेथे नेमके काय झाले याविषयी अद्याप समजले नसले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप डळमळीत आहेत हे नक्की…!! Local elections are still shaky, but the discussion is on Adhalrao Patil and Dr. Amol Kolhe

    पण आता त्या पलिकडे जाऊन पत्रकारांच्या प्रश्नांमुळे शिरूरचे पुढचे खासदार नेमके कोण??, याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांना शिरूर मच्या खासदारांबाबत प्रश्न विचारल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील संसदेत असतील, असे त्यांनी उत्तर दिले. त्यावर मराठी माध्यमांनी शिरूरचे पुढचे लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, तर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे राजकीय भवितव्य काय असणार…??, असा सवाल करत त्यावर चर्चा सुरु केली आहे…!!

    – संसदेत म्हणजे नेमके कोणत्या सभागृहात??

    या चर्चेमध्ये एक मोठा अयब म्हणजे दोष आहे. संजय राऊत यांनी शिवाजीराव आढळराव पाटील हे “संसदेत” असतील असे म्हटले आहे. हे म्हणजे ते नेमके कोणत्या सभागृहात असतील…??, याचा खुलासा संजय राऊत यांनी केलेला नाही. ते लोकसभेचे खासदार असतील की राज्यसभेचे खासदार असतील??, हा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला नाही त्यामुळे राऊत यांनी देखील चतुराईने त्या प्रश्नाचे उत्तर देखील अध्याहृत ठेवत ते दिलेच नाही…!!

    याचा अर्थ लगेच आढळराव-पाटील यांच्यासाठी राज्यसभेची एखादी जागा ठेवली जाईल असाही कोणी काढण्यात मतलब नाही. पण संजय राऊत यांच्या वक्तव्यानुसार शिवाजीराव पाटील जर संसदेत असतील, तर ते नेमके कोणत्या सभागृहाचे सदस्य असतील हा प्रश्न मात्र नक्की उपस्थित होईल, यात शंका नाही…!!

    – दबक्या आवाजातील चर्चा

    अशा स्थितीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे राजकीय भवितव्य काय असेल…?? त्यांना राष्ट्रवादी समजावून सांगेल की तेच स्वतः याचा राजकीय अर्थ समजावून घेऊन आपला वेगळा मार्ग चोखाळत ते भाजपच्या दिशेने जातील आणि शिरूर लोकसभेचे तिकीट मिळवतील…??, याविषयी देखील दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसे देखील लोकसभा निवडणुकांना खऱ्या अर्थाने 2.5 वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे तोपर्यंत होणाऱ्या राजकीय-चर्चा “अंदाज पंचे दाहोदर्से” अशाच राहणार आहेत…!!

    त्यातही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बद्दल जरा तरी काही आडाखे बांधता जरूर येतील, पण भाजपच्या बद्दल आडाखे बांधणे म्हणजे मोदी – शहा यांच्या मनात नेमके काय चालले आहे हे ओळखण्यासारखे आहे… जे कोणालाही शक्य नाही…!! अशा स्थितीत डॉ. अमोल कोल्हे यांचे नेमके राजकीय भवितव्य काय हे ते स्वतःदेखील कितपत सांगू शकतील की नाही याविषयी शंका आहे.

    – मावळ – शिरूर आदला – बदली??

    शिवाजीराव आढळराव पाटील है शिवसेनेचे उमेदवार असताना त्यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवून पराभव केला आहे. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत उडी मारली होती, हे शिवसैनिक विसरलेले नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांनी आढळराव पाटलांची याबाबतीत खात्रीलायक विधान केले असावे. पण हा प्रश्न फक्त शिवाजीराव आढळराव पाटील अथवा डॉ. अमोल कोल्हे यांच्या राजकीय भवितव्याचाच असेल असे नाही. तर त्यामध्ये तिसरा कोन तितकाच महत्त्वाचा आहे. तो मावळ मतदार संघाचा आहे. मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्याकडून काढून घेऊन राष्ट्रवादीकडे खेचून घेण्याचा आहे मावळ लोकसभा मतदार संघ पार्थ पवारसाठी शिवसेनेकडून खेचून घेण्याचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आधीच डाव आखला आहे… आता त्यांचा हा डाव किती यशस्वी होईल…?? शिवसेना खरेच आपली हातातली आयती जागा राष्ट्रवादीला प्रदान करेल का…?? आणि त्या बदल्यात शिरूरची जागा आढळराव पाटलांच्या खात्यात जमा करून देईल का…??, हा देखील तितकाच कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे…!!

    – अमोल कोल्हे यांचे दीर्घकालीन भवितव्य

    अशा स्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील दुहेरी संघर्षात डॉ. अमोल कोल्हे या तरुण खासदाराचे भवितव्य मात्र निश्चित नेमके काय असेल…??, हे आत्ता तरी सांगणे अवघड आहे. त्याचबरोबर स्वतः अमोल कोल्हे यांनी राजकीय भवितव्य ओळखत आपली स्वतंत्र वाट चोखायची ठरवली असेल तर ते देखील सध्या कळायला काही मार्ग नाही… पण महाराष्ट्रातल्या राजकीय शक्यतांचा आणि भविष्यातील “दीर्घकालीन” राजकीय त्रैराशिकांचा बारकाईने विचार केला तर अमोल कोल्हे भाजपच्या दिशेने जाऊन नवी खेळी उभाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही…!!

    Local elections are still shaky, but the discussion is on Adhalrao Patil and Dr. Amol Kolhe

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा