प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार आले. मात्र, बहुमत चाचणीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार अनुपस्थित होते. यात अशोक चव्हाणांसह काही मोठ्या नेत्यांचाही समावेश होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या होत्या. अशात आता गिरीश महाजन यांच्या एका दाव्याने खळबळ उडवली आहे.Like Shiv Sena, big revolt is expected in Congress; Girish Mahajan’s claim
काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. महाजन म्हणाले, की मी नावं सांगू शकत नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता संपर्कात आहेत. आधीचं महाविकास आघाडीचं सरकार अपघाताने आलं होतं. माझ्या संपर्कातील लोकांना असं वाटतं की तिकडे राहून काही उपायोग नाही.
पुढे ते म्हणाले, की महाविकास आघाडीत सेनेची नैसर्गिक युती नव्हती. शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. जनतेने आम्हाला निवडून दिले होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व विकासाच्या दृष्टीने नंबर एकवर आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की भाजपशिवाय आता पर्याय नाही.
Like Shiv Sena, big revolt is expected in Congress; Girish Mahajan’s claim
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांचा राजीनामा; सर्वपक्षीय सरकार बनवण्याचे आवाहन आणि आव्हान!!
- मेळघाट येथे दूषित पाण्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांची दिल्लीतून पाच लाखांची मदत
- Sri Lanka Crisis : कर्जात लोटली, जनता लुटली; राजपक्षेंच्या घराणेशाहीने श्रीलंका बुडविली!!
- Sri lanka : भारताची श्रीलंकेला अवघ्या 3 महिन्यांत 2.5 अब्ज डॉलरपेक्षा अधिक मदत, तरीही लंका आर्थिक गर्तेतच!!