• Download App
    सरकार की बदलायचे माझ्यावर सोडा, पण सरकारला जागा दाखवून देण्याची संधी, देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवेढ्यात इशारा Leave it to me to change the government, but an opportunity to show the government a place, Devendra Fadnavis warns on Tuesday

    सरकार की बदलायचे माझ्यावर सोडा, पण सरकारला जागा दाखवून देण्याची संधी, देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवेढ्यात इशारा

    एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. Leave it to me to change the government, but an opportunity to show the government a place, Devendra Fadnavis warns on Tuesday


    विशेष प्रतिनिधी 

    मंगळवेढा : एका मतदारसंघाच्या निवडणुकीने काय फरक पडणार आहे, त्याने काय सरकार बदलणार आहे का? असे अनेकांना वाटत असेल. पण, सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, सरकारला जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाला आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

    पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराच्या सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारचे नाव बदलून महावसुली आघाडी झाले आहे. जिथे जाऊ तिथे खाऊ अशी सरकारमधील मंत्र्यांची कामे आहेत.

    दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पाणी देतो म्हणून अनेक भूलथापा देऊन हे निवडून आले होते. पण पाणी काही मिळाले नाही. निवडणूक आली की कोणता तरी बनावट कागद दाखवून फसवणूक करून मते मिळवली आहेत. कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही.

    जे मुख्यमंत्री बांधावर जाऊन सांगत होते हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळवून देऊ, पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पद्धतीने वीजबिलाची शेतककडून वसुली केली. लॉकडाऊनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते, त्यांना दुप्पट बिले देऊन आपली तिजोरी भरली, विजेची थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कापली. त्यांचे रोहित्र उचलून नेल्याचे पाप यांनी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

    Leave it to me to change the government, but an opportunity to show the government a place, Devendra Fadnavis warns on Tuesday


    महत्वाच्या बातम्या वाचा…

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!