Kiran Mane Controversy : मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी एका निवेदनात स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘मुलगी झाली हो’ या टीव्ही शोमधून भारतीय जनता पक्षाविरोधात बोलल्यामुळे हकालपट्टी केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता वाहिनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शोमधील अनेक सहकलाकारांसोबतचे त्यांचे गैरवर्तन हेच त्यांच्या शोमधून बाहेर पडण्याचे कारण बनले आहे, असे म्हणत चॅनलने एक खुलासा दिला आहे. Kiran Mane Controversy Expulsion of Kiran Mane from serial has nothing to do with politics, channel clarifies
प्रतिनिधी
मुंबई : मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी एका निवेदनात स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘मुलगी झाली हो’ या टीव्ही शोमधून भारतीय जनता पक्षाविरोधात बोलल्यामुळे हकालपट्टी केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता वाहिनीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शोमधील अनेक सहकलाकारांसोबतचे त्यांचे गैरवर्तन हेच त्यांच्या शोमधून बाहेर पडण्याचे कारण बनले आहे, असे म्हणत चॅनलने एक खुलासा दिला आहे.
स्टार प्रवाह या मराठी मनोरंजन वाहिनीने आपल्या वक्तव्यात किरण माने यांचे दावे फेटाळून लावले आहेत. पीटीआयशी बोलताना अभिनेते किरण माने म्हणाले होते की, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात सोशल मीडियावर भाष्य केल्याबद्दल त्यांना स्टार प्रवाहच्या शोमधून काढून टाकण्यात आले आहे. इतकंच नाही तर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काहीही बोलू नका, असं वाहिनीनं सांगितलं असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाहिनीने दिले स्पष्टीकरण
‘मुलगी झाली हो’ या शोमध्ये विलास पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप निराधार आणि बनावट असल्याचे वाहिनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. असे आरोप होणे दुर्दैवी आहे. प्रॉडक्शन हाऊसने दुजोरा दिला आहे की माने यांना काढून टाकण्याचा निर्णय शोमधील अनेक सहकलाकारांशी, विशेषत: शोच्या महिला कलाकारांशी गैरवर्तन केल्याबद्दल घेण्यात आला आहे. त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या अपमानास्पद आणि आक्रमक वागणुकीविरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, किरण माने यांना अनेक इशारे देऊनही शोच्या सेटवर सभ्यपणा आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करणे सुरू ठेवले. महिलांबद्दलच्या कोणत्याही प्रकारच्या अपमानास्पद वागणुकीबद्दल आमचे झीरो टॉलेरन्स धोरण आहे, आम्ही त्यांना शोमधून काढून टाकण्याच्या आमच्या निर्णयाचे समर्थन करतो. कंटेंट इंडस्ट्रीचे सदस्य म्हणून, आम्ही सर्व विचारांचा आदर करतो आणि स्वतःला भाषण स्वातंत्र्याचे रक्षक समजतो. तथापि, आम्ही आमच्या कलाकारांसाठी, विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.”
मनसे, शिवसेनेचाही किरण मानेंना पाठिंबा नाही
अभिनेता किरण माने यांनी फेसबुकवर राजकीय पोस्ट टाकत असल्याने स्टार प्रवाह मालिकेतून काढल्याचा दावा केला. यावरुन महाराष्ट्रात किरण मानेंच्या समर्थनार्थ I Stand With Kiran Mane हे कॅम्पेन सोशल मीडियावर सुरू झालं. किरण माने प्रकरणात राजकीय नेतेमंडळीनीही उडी घेतली. काँग्रेसचे सचिन सावंत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी हा तर भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणून आरोप करत किरण माने प्रकरणी भाजपावर निशाणा साधला होता.
दुसरीकडे, याप्रकरणी मनसेचे अमेय खोपकर यांनी किरण माने यांच्या विरोधात भूमिका मांडल्यानंतर शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनीही किरण मानेंना फटकारलं. आदेश बांदेकर म्हणाले की, किरण माने यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते असा वाद निर्माण करत आहेत. हा सगळा वेडेपणा आहे. मागच्या अनेक वर्षांपासून मी इंडस्ट्रीत काम करतोय. पण मला इतक्या दिवसात असा कुठलाही अनुभव आला नाही. कुठलंही चॅनेल असं करत नाही. किरण मानेंच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचं असल्याने हे सगळं करतायेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
किरण माने – शरद पवारांची भेट
किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली. मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण. मी शरद पवार यांच्याकडेच का गेलो, कारण शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तिमत्त्व आहे. भारतातील कला क्षेत्राचं त्यांना प्रचंड ज्ञान आहे, अभ्यास आहे. त्यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही, बाकीचे उथळपणाने प्रतिक्रिया देणारे नेते आहेत. मी त्यांचा प्रचंड आदर करतो, म्हणून ते जर म्हणाले की, एखादी गोष्ट विचार न करता कर, तर मी ती नाही करणार, मी अंधपणे होकार नाही देत. पण माझी बाजू त्यांच्याकडे मांडावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, असेही मानेंनी म्हटले होते.
Kiran Mane Controversy Expulsion of Kiran Mane from serial has nothing to do with politics, channel clarifies
महत्त्वाच्या बातम्या
- Omaicron : दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन राहण्याची गरज नाही , प्रवाशांना मिळाला दिलासा
- एक मराठा, लाख मराठाचा राज्यात जयघोष; ‘शिवनेरी ते मुंबई’ असा लॉंग मार्च’ काढणार
- युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न : चोराला सोलापूर पोलिसांनी केली अटक
- गोव्यात लँड माफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात राजकारणाची सूत्रे : संजय राऊत यांची टीका
- वक्फ बोर्ड जमीन बळकावली, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दखल ; बीड जिल्ह्यात खळबळ