• Download App
    जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला सुवर्णमंदिर भेटीचा पीएम मोदी आणि राहुल गांधींचा फोटो, देवाला पाठ दाखवल्यावरून टीका, नेटकऱ्यांनी आव्हाडांनाच केले ट्रोल । Jitendra Awhad shared a photo of PM Modi and Rahul Gandhi visiting Suvarnamandir, criticized by Twitter users

    जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला सुवर्णमंदिर भेटीचा पीएम मोदी आणि राहुल गांधींचा फोटो, देवाला पाठ दाखवल्यावरून टीका, नेटकऱ्यांनी आव्हाडांनाच केले ट्रोल

    राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या हजरजबाबीपणा आणि सडतोड ट्वीटसाठीही प्रसिद्ध आहेत. अशाच त्यांनी मोदींवर टीका करणारे एक ट्वीट केल्याने त्यांची चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे सुवर्णमंदिर भेटीचे फोटो शेअर करत दोन्ही फोटोंतील फरक सांगितला. आव्हाड यांच्या मते, मोदींनी देवाकडे पाठ केली तर राहुल गांधींनी देवाकडे तोंड करून संस्कृती रक्षण केले. परंतु यावरून नेटकऱ्यांनी त्यांना इतरही फोटो दाखवून ट्रोल केले आहे. Jitendra Awhad shared a photo of PM Modi and Rahul Gandhi visiting Suvarnamandir, criticized by Twitter users


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या हजरजबाबीपणा आणि सडतोड ट्वीटसाठीही प्रसिद्ध आहेत. अशाच त्यांनी मोदींवर टीका करणारे एक ट्वीट केल्याने त्यांची चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे सुवर्णमंदिर भेटीचे फोटो शेअर करत दोन्ही फोटोंतील फरक सांगितला. आव्हाड यांच्या मते, मोदींनी देवाकडे पाठ केली तर राहुल गांधींनी देवाकडे तोंड करून संस्कृती रक्षण केले. परंतु यावरून नेटकऱ्यांनी त्यांना इतरही फोटो दाखवून ट्रोल केले आहे.

    आव्हाडांच्या या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी राहुल गांधींचेही सुवर्णमंदिराकडे पाठ असलेले फोटो शेअर केले. एवढेच नाही, तर काही युजर्सनी तर खुद्द आव्हाड यांचाच देवाकडे पाठ करून सेल्फी काढलेला फोटा शेअर केला आहे. आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, “तुम्हीच ठरवा… संस्कृती कुणी जपली… देवाला पाठ दाखवू नये आसे म्हणतात .. पण छायाचित्र बघा आणि ठरवा!”

    Jitendra Awhad shared a photo of PM Modi and Rahul Gandhi visiting Suvarnamandir, criticized by Twitter users

    आव्हाड यांच्या ट्वीटवर आलेल्या या काही रिअॅक्शन पाहा…

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा