संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’ या गाण्यावर डान्स केला होता.”It’s a family event,” said Supriya Sule on a dance video. Said ….
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल (२९ नोव्हेंबरला) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हारशी पार पडला.या विवाहात संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लंबोर्गिनी चलाई जाने ओ’ या गाण्यावर डान्स केला होता.
सोशल मीडियावर हा डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर या डान्सचे अनेकांनी कौतुक केलं आहे तर काहींनी टीका केली आहे. त्या टिकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की , “आमच्या घरातील मुलीचं लग्न होत. तो एक कौटुंबिक कार्यक्रम आहे.त्यामध्ये बाहेरच कोणी नव्हतं. एका खासगी कार्यक्रमात आम्ही काय करतो त्यावर कोणाला टीका करायची असेल तर काय बोलणार? असा प्रतिप्रश्न सुळे यांनी केला आहे.