• Download App
    Islamic State : पुण्याच्या कोंढव्यातील संशयित तल्हा खानच्या घरावर NIA चे छापे; खुरासन प्रांत, अबुधाबी मोड्यूलशी कनेक्शन उघडकीस!! । Islamic State: NIA raids Talha Khan's house in Kondhwa, Pune; Khurasan Province, Connection with Abu Dhabi Module Revealed !!

    Islamic State : पुण्याच्या कोंढव्यातील संशयित तल्हा खानच्या घरावर NIA चे छापे; खुरासन प्रांत, अबुधाबी मोड्यूलशी कनेक्शन उघडकीस!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केले आहे. तल्हा खान हा “इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत” या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. Islamic State: NIA raids Talha Khan’s house in Kondhwa, Pune; Khurasan Province, Connection with Abu Dhabi Module Revealed !!

    या प्रकरणात जहानझीब वानी आणि त्याची बायको हिना बशीर बेग या काश्मिरी जोडीला मार्च 2020 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीत लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात 8 मार्च 2020 रोजी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर एनआयएने 20 मार्च 2020 रोजी या प्रकरणाची फेरनोंद केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अब्दुल्ला बसीत, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीकी खत्री आणि अब्दुल रहमान या चौघांना अटक केली होती.



    सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दीकी खत्री यांना जुलै 2020 मध्ये एनआयएने अटक केली होती. तल्हा खान हा नबील सिद्दीकी खत्रीच्या संपर्कात असल्याचे एनआयएला तपासात आढळून आल्यानंतर हे छापे घालण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

    जहानझीब वानी आणि हिना बेग हे पुण्यातील व्यायामशाळा चालवणाऱ्या खत्री आणि सादिया यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. एनआयएने खत्रीवर भारतात हिंसक दहशतवादी हल्ले घडवण्यास मदत केल्याचा आरोप केला होता, तर सादियावर भारतात IS चे कॅडर तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. याशिवाय वानी आणि बेग हे हैदराबादच्या अब्दुल्ला बासितच्या संपर्कात होते, ज्याला ISIS च्या अबूधाबी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती.

    या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारसरणी पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट करुन हत्या करणे, हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

    Islamic State : NIA raids Talha Khan’s house in Kondhwa, Pune; Khurasan Province, Connection with Abu Dhabi Module Revealed !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!