विशेष प्रतिनिधी
मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार अॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. रश्मी ठाकरे या दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका आहेत.Insult to the national flag by the wife of the Chief Minister
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे अॅड. पाटील यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अॅड. पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. राष्ट्रगीतानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देत होते.
मात्र, त्यावेळी रश्मी ठाकरे या स्तब्ध उभ्या होत्या. त्यांनी ध्वजाला सलामी दिलेली नाही. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. तसेच, त्यांच्या या कृतीमुळे लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, असे अॅड. पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.
Insult to the national flag by the wife of the Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- Mumbai : वांद्र्यात चार मजली इमारत कोसळली ,15 जण जखमी ; 6 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल
- राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन
- बीड : पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच एकाने केला आत्मदहन प्रयत्न ; पोलिसांमुळे टळला अनर्थ
- Republic Day : नागपुरात दिव्यांग मुलीने अंबाझरी तलावात केले ध्वजारोहण
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा तूर्त तरी कोणताच नेता नाही; सध्या मतदान झाले तर मोदीच मोदींना पर्याय