• Download App
    पवारांच्या निर्णयामागे घरातलेच असेल भांडण, तर बाहेरच्यांशी लढायला कशी मिळेल ताकद?? Inside struggle in NCP lead to sharad Pawar's decision of quitting presidential post

    पवारांच्या निर्णयामागे घरातलेच असेल भांडण, तर बाहेरच्यांशी लढायला कशी मिळेल ताकद??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी खळबळ उडाली आहे, त्यामागची अनेक कारणे टप्प्याटप्प्याने बाहेर येऊ लागली आहेत. त्यापैकी एक कारण पवारांच्या घरातलेच वाद आणि भांडण असल्याचे सांगितले जाते. Inside struggle in NCP lead to sharad Pawar’s decision of quitting presidential post

    सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार आणि त्या पुढची वेळी रोहित पवार विरुद्ध पार्थ पवार हा वाद सोडविण्याच्या दृष्टीने आणि आपला हात वरचाच ठेवण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पण अर्थातच “पवार पॉलिटिक्स” नुसार त्यांनी एक एस्केप रूट ही त्यात ठेवला आहे. म्हणूनच त्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांकडे आणि नेत्यांकडे 2 – 3 दिवसांचा वेळ मागितला आहे.

    आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशाच्या निमित्ताने पवारांनी निवृत्तीच्या मोठा खडा टाकून पाहिला आणि प्रतिक्रिया आजमावल्या. फारच तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर ब्रिदिंग स्पेस म्हणून 2 – 3 दिवसांचा वेळ मागितला, पण या सगळ्यांमध्ये जर घरातल्या वादामुळेच पवारांनी जर खरंच हा निर्णय घेतला असेल आणि त्यातून तो वाद सुटणार असेल, तर एवढी मोठी राजकीय मशक्कत करून बाकीच्या बलाढ्य राजकीय पक्षांची लढायला कसे बळ मिळेल??, हा खरा प्रश्न आहे.

    एकतर सध्या कर्नाटकची निवडणूक सुरू आहे. तेथे फक्त जयंत पाटील प्रचाराला गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 46 उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. पण तिचे फक्त 9 उमेदवार उभे केले आहेत. यातून राष्ट्रवादी काँग्रेसला गमावलेला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता नाही. म्हणजे एकीकडे कर्नाटक राज्याची महत्त्वाची निवडणूक सुरू असताना दुसरीकडे पवारांनी आपल्याच पक्षाला निवृत्तीच्या पेचात टाकले आहे. यातून पवारांना नेमके काय साध्य करायचे आहे आणि त्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या प्रबळ अशा भाजप आणि शिवसेना या शक्तींशी राष्ट्रवादी काँग्रेस लढत देण्याइतपत किती तयार होईल??, हा खरा प्रश्न आहे.



    कार्यकर्त्यांना धक्का

    शरद पवारांचा हा निर्णय म्हणजे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी धक्का होता. सभागृहामध्येच नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. शरद पवार मात्र भूमिकेवर ठाम राहून सिल्व्हर ओकवर निघून गेले.

    पवारांनी का सोडलं अध्यक्षपद?

    • शरद पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत “अचानक” राष्ट्रवादीचे अध्यक्षपद का सोडले? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पवारांनी अध्यक्षपद सोडण्यामागे 4 कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
    • अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार, या चर्चांना विराम देण्यासाठी ही शरद पवारांची खेळी असू शकते, कारण या निर्णयामुळे अजित पवार अडचणीत येतील आणि राष्ट्रवादी पक्षातले अजितदादांचे महत्त्व कमी होऊन त्यांच्या गटाचे आमदारही त्यांच्याबरोबर जाणार नाहीत.
    • बाळासाहेब ठाकरे यांना हयातीत पक्ष फुटल्याचे दुःख सहन करावे लागले होते अनेक बडे नेते त्यांना सोडून गेल्याचे पहावे लागले होते. पण आपल्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष फुटला हा कलंक माथी लावून घ्यायचा नाही, यामुळे पवारांनी हे पाऊल उचलले असू शकते. म्हणजेच उद्या पक्ष फुटला तर मी आता पक्षात सक्रीय नाही, मी अध्यक्ष नाही, मी असतो तर असं झालं नसतं, असा एस्केप रूट ते काढू शकतात.
    • सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात पक्ष वाटणी व्हावी, ती देखील स्वतःच्या मनाप्रमाणे, याकरता ही भावनात्मक खेळी करून राष्ट्रीय आणि राज्य राजकारणाची जबाबदारी शरद पवार वाटून देऊ शकतात.
    • आजच्या भावनिक परिस्थितीचा दाखला देत उद्या जर राष्ट्रवादीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण? तसंच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? राज्य अध्यक्ष कोण? याबाबत अंतिम निर्णय आपण घेऊ शकू, अशी शरद पवारांना वयाच्या 83 व्या वर्षी आशा आहे.
    • शरद पवारांच्या राजीनाम्यामागे ही 4 कारणे असू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण खरंच त्या पलीकडे जाऊन राष्ट्रवादीला अंतर्गत संघर्ष सोडवण्यासाठी पवारांना स्वतःचा निवृत्ती सारखा संवेदनशील निर्णय घ्यावा लागत असेल, तर त्यातून पक्षाची ताकद खरंच किती वाढेल आणि त्याचा लाभ बाकीच्या बलाढ्य राजकीय पक्षांशी लढताना किती होईल??, याविषयी फार मोठे प्रश्नचिन्ह आहे.

    Inside struggle in NCP lead to sharad Pawar’s decision of quitting presidential post

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा