• Download App
    Income raids : मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!! । Income raids: Income tax raids on the house of Mumbai Municipal Corporation Standing Committee Chairman Yashwant Jadhav !!

    Income raids : मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईडीचा कारवाईचा जोर दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेतेही ईडीच्या रडावर आहेत. नुकतेच बुधवारी, २३ फेब्रुवारी रोजी ८ तासांची चौकशी ईडीने केल्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. ईडीने अटक केली, त्यानंतर त्यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता तपास यंत्रणेच्या रडारवर शिवसेनेचा एक नेता असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. Income raids: Income tax raids on the house of Mumbai Municipal Corporation Standing Committee Chairman Yashwant Jadhav!!

    मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. कोणत्या तपास यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले जात आहे.



    यशवंत जाधवांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. बेनामी संपत्ती प्रकरणी यशवंत जाधव आणि त्यांची आमदार पत्नी यामिनी जाधवांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते. आयकर विभागाच्या केंद्रीय पथकाने यशवंत जाधवांच्या घरी शुक्रवारी सकाळीच धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी होत आहे. या तपास पथकासह यशवंत जाधव यांच्या घरी सीपीआरएफचे जवान देखील दाखल झाले आहे.

    यशवंत जाधव यांच्यावरचे आरोप

    • यशवंत जाधवांवर १५ कोटी घोटाळ्याचा आरोप
    • हे १५ कोटी रूपये यूएईला हलवल्याचा सोमय्यांनी आरोप केला होता.
    • बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटींचा घोटाळा केल्याचे उघड

    आघाडीच्या नेत्यांमागे ईडीची पीडा

    महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या नेत्यांवरही ईडीचा डोळा असून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांच्या मागे येत्या काही दिवसांत ईडीची पीडा लागणार असल्याचे संकेत अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच, आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याची चर्चा सध्या सरू आहे.

    Income raids : Income tax raids on the house of Mumbai Municipal Corporation Standing Committee Chairman Yashwant Jadhav !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!