विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : उद्घाटन होते उच्च न्यायालयाच्या खंडपीठ इमारतीचे आणि मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला केंद्र सरकारवर!! राज्यांच्या अधिकारांवर गदा आणाल तर खपवून घेणार नाही, असा मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला. Inauguration of Aurangabad Bench of High Court; Chief Minister targets Center
गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्य सरकारे विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहेत. कोरोना काळात लस, रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकारमधील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवले. आता तर न्यायालयाचे कार्यक्रमही सोडत नाहीत. या मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणली जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा केंद्र सरकारला दिला आहे. औरंगाबाद येथील उच्च न्यायालय खंडपीठाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते.
घटनेत केंद्राला किती अधिकार आहेत राज्याला किती आहेत, राज्यांच्या वर केंद्र आहे का? केंद्र सरकार बॉस होणार असा प्रश्न आला, तेव्हा स्पष्ट झाले की काही अधिकार वगळता राज्य सार्वभौम आहेत. त्यामुळे राज्यांच्या अधिकारावर गदा येतेय का ते पहिले पाहिजे. यावर तज्ज्ञ लोकांकडून प्रकाश पडेल अशी माझी अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
रात्री राहायला जागा नसल्याने महिला कुठेही झोपतात आणि मग त्यांच्यावर अत्याचार होतात. त्यामुळे मुंबईत आपण निवाऱ्याची सोय करत आहोत. गुन्हा घडल्यावर शिक्षा झाली पाहिजे, पण आपण अशी व्यवस्था निर्माण करू की गुन्हा घडलाच नाही पाहिजे, न्यायालये रिकामी पडली पाहिजेत. न्यायदान ही फक्त न्यायालयाची जबाबदारी नाही ही सर्वांची जबाबदारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
अमृतमहोत्सवाचे अमृतमंथन व्हायला हवे
माझ्या आणि आताच्या पिढीला स्वातंत्र्य अनायसे, कुठलेही कष्ट न घेता मिळाले आहे. आता साजरा केला जाणारा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव महत्वाचा आ.हे पण या अमृतमहोत्सवाचे अमृतमंथन सुद्धा व्हायला हवे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Inauguration of Aurangabad Bench of High Court; Chief Minister targets Center
महत्त्वाच्या बातम्या
- स्वस्त सोने खरेदीची संधी २५ ऑक्टोबरपासून; मोदी सरकारची भेट, ऑनलाइन खरेदीवर सूट
- बेपत्ता परमवीर सिंग चंदीगडमध्ये? ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’मुळे संशय बळावला!; आयोगासमोर काही सांगायचे नाही
- Coronavirus update : देशात १६ हजार जणांना कोरोना, २४ तासांतील चित्र; ६६६ जणांचा आजाराने मृत्यू झाल्याचे उघड
- संघात एककल्ली उजव्या विचारसरणीला थारा नाही; अनेक संकल्पना डाव्या विचारसरणीतूनही घेतल्यात; सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचे प्रतिपादन