समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केल्याने त्याचा निषेध करत अतुल भातखळकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.In Wadgaon Maval, a Nationalist Aggressive, Jode Maro Andolan was organized against Atul Bhatkhalkar
विशेष प्रतिनिधी
मावळ : भाजप नेते अतुल भातखळकरांनी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार सुनील शेळके यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवून तसेच त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते.त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.मावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले.तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केल्याने त्याचा निषेध करत अतुल भातखळकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.
सुनील शेळके यांच्याबद्दल चुकीची माहिती तसेच बदनामी केल्याप्रकरणी भाजप नेते अतुल भातखळकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
In Wadgaon Maval, a Nationalist Aggressive, Jode Maro Andolan was organized against Atul Bhatkhalkar
महत्त्वाच्या बातम्या
- अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिर कसे साकारतेय?, पहा या थ्रीडी फिल्म मधून!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार गैरहजर ; काय आहे कारण ?
- Gang Rape Case : राजस्थानात ‘निर्भया’सारखे क्रौर्य, पीडितेची प्रकृती स्थिर, राजकारण तापले
- मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे , खासदार इम्तियाज जलील यांची खोचक टीका