विशेष प्रतिनिधी
पंढरपुर :– आज देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभारा , संपूर्ण मंदिर, श्री संत नामदेव पायरी, महाद्वार येथे फुलांची आकर्षक आरास करण्यात आली. त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह श्री विठ्ठल सभा मंडपास व मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले. आजची सजावट पुण्याचे विठुभक्त भारत भुजबळ यांनी देवाच्या चरणी अर्पण केली. In the temple of Vitthal of Pandharpur Attractive floral arrangement
मंदिर सजावटीसाठी झेंडू, जरबेरा, शेवंती, गुलछडी, ऍनथोरीयम, ऑरकेड, गुलाबसह २० ते २५ फुलांचे प्रकार व फुलांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली. यासाठी साधारणतः ५ टन फुले वापरण्यात आली आहेत. फुलांची आरास पुण्याचे श्री लक्ष्मी फ्लॉवर्स आणि डेकोरेटर्स यांनी केली.
- पंढरपूरचे विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास
- मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप
- पुण्याचे विठुभक्त भारत भुजबळ यांची सेवा अर्पण
- झेंडू, जरबेरा, शेवंती, गुलछडी, ऍनथोरीयम, ऑरकेड, गुलाबसह २० ते २५ फुलांचे प्रकार
- साधारणतः पाच टन फुले वापरण्यात आली आहेत
- पुण्याचे श्री लक्ष्मी फ्लॉवर्स आणि डेकोरेटर्स यांनी आरास केली