विशेष प्रतिनिधी
मुंबई: लशीचे दोन्ही डोस घेतले असले तरी परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या नव्या नियमावलीनुसार राज्याने हा बदल केलेला आहे.In spite of both doses of vaccine are taken, RTPCR is mandatory for entry into Maharashtra from abroad
युरोपीय, आखाती भागातील देश आणि दक्षिण आफ्रिकेसह परदेशातून प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोनाची बाधा झाली नसल्याचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक असल्याचे राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
प्रवाशांनी लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या असल्या तरी चाचणी अहवाल दाखविणे बंधनकारक आहे. तसेच याआधीचे चाचण्यासंबंधीचे सर्व नियम या नव्या आदेशानुसार रद्द करण्यात आले आहेत.
In spite of both doses of vaccine are taken, RTPCR is mandatory for entry into Maharashtra from abroad
महत्त्वाच्या बातम्या
- भंगार विक्रेत्याकडून जबरदस्तीने ‘जय श्री राम’ म्हणवून घेतले , घोषणा देणाऱ्या दोन्ही तरुणांना अटक
- माजी राष्ट्रपती अशरफ घनी तालिबान सरकारमध्ये सामील होऊन अफगाणिस्तानात परतू शकतात
- ठाकरे – फडणवीस “बंद दाराआडच्या चर्चा” ही मीडियाची “लावालावी”; नारायण राणेंनी सटकावले
- पुण्यात राष्ट्रवादीच्या आमदाराचा कार्यक्रमाला उशीर, मग राज्यमंत्री अब्दुल सत्तारांनी सोडला मंच