विशेष प्रतिनिधी
मुंबई : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलचे दर ७४ ते ८४ पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलच्या दरातही ७५ ते ८५ पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९६.६७ रुपये प्रति लीटर मिळत आहे.In Mumbai, petrol is priced at Rs 120.51
मुंबईत पेट्रोलचा दर १२०.५१ रुपये तर डिझेलचा दर १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत ११५.१२ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९९.८३ रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नव्हती.
या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे आहे, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. किरकोळ विक्रीचे दर हळूहळू वाढवले जातील, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
In Mumbai, petrol is priced at Rs 120.51
महत्त्वाच्या बातम्या
- Weather Alert : एप्रिल तर मेपेक्षाही तापला, हवामान खात्याचा पुढील ५ दिवसांचा इशारा, कुठे पडणार पाऊस अन् कुठे लाही-लाही होणार? वाचा सविस्तर…
- उत्तर प्रदेशात मुस्लिम डॉक्टरविरोधात निघाला फतवा, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर केली होती पुष्पवृष्टी
- WATCH : नांदेडमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, पोलिसांनी केली एसआयटी स्थापन
- ईडीच्या अधिकाऱ्यांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील