वृत्तसंस्था
मुंबई : राजधानी मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही लागण झालेल्यांपेक्षा जास्त आहे. 24 तासांत मुंबई एकूण 3,039 रुग्णांची नोंद झाली. 4,052 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रिकव्हरी रेट 90 टक्के झाला आहे. In Mumbai Coronavirus patient recovery rate is 90 %
शहरात 35224 कोरोना चाचणी केल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी 71 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत 49 हजार 499 सक्रीय रुग्ण आहेत.
बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. लहान मुलांमध्ये कोरोना वाढत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे.
In Mumbai Coronavirus patient recovery rate is 90 %
महत्त्वाच्या बातम्या