• Download App
    शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वसुचनेशिवाय खंडित करणे बेकायदा; वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे |Illegal disconnection of power supply to agricultural pumps without prior notice; Pratap Hogade, Chairman, Electricity Consumer Board

    शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वसुचनेशिवाय खंडित करणे बेकायदा; वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे

    विशेष प्रतिनिधी

    धुळे : पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित करणे बेकायदा आहे, असे वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले. शेतकरी परिषदेनंतर ते बोलत होते.Illegal disconnection of power supply to agricultural pumps without prior notice; Pratap Hogade, Chairman, Electricity Consumer Board

    वीज वितरण कंपनी सध्या राज्यातील लाखो शेती पंपाचा वीज पुरवठा बेकायदा खंडित करत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेची व दिलेल्या आश्वासनाची ही वीज कंपनी पायमल्ली करत आहे. असा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक मंडळाचे अध्यक्ष तथा वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी केला.



    कोणत्याही वीज ग्राहकांना त्याचा वीजपुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करायचा असेल तर, त्यासाठी प्रथम पंधरा दिवसांत याची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. वीज कायद्यातील तशी तरतूद कंपनीवर बंधनकारक आहे.

    पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडित करण्याची बेकायदा कृती सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे सर्व शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांनी आमच्याकडे तक्रार दाखल करावी. यासाठी भविष्यात मोठा लढा उभारणार असल्याचा इशारा प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

    Illegal disconnection of power supply to agricultural pumps without prior notice; Pratap Hogade, Chairman, Electricity Consumer Board

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!