राज्यभर आता मागणी नाही आणि विनंती नाही तर धर्म युद्ध आणि तांडव करण्यात येईल असा इशारा भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला. If temple are not opened, there will be Yadav all over the state. Chief Minister should be ready for religious war, warning of BJP’s spiritual front
विशेष प्रतिनिधी
नाशिक : राज्यभर आता मागणी नाही आणि विनंती नाही तर धर्म युद्ध आणि तांडव करण्यात येईल असा इशारा भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिला.
नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठी रामकुंड येथे संत महतांच्या उपस्थितीत शंखध्वनी आणि घंटानाद करून आंदोलन करण्यात आले. यावेळी भोसले म्हणाले, बहुतांश निर्बंध शिथिल होऊन सुद्धा केवळ मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. राज्य सरकार हे कंसाप्रमाणे असून धर्माला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आता मंदिर उघडले नाही तर राज्यभर तांडव होईल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात आता सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही मंदिर आणि धार्मिक स्थळे बंद आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांशी संबंधित लाखो नागरिकांची आर्थिक अडचण त्यामुळे होत आहे तसेच मंदिरे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने मंदिरे आरोग्य नियमांचे पालन करून सर्व व्यवस्थित खुली होऊ शकतात असे वारंवार सांगूनही मंदिर उघडली जात नसल्याने भाजपाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
केवळ धार्मिक स्थळे बंद ठेवणं ही कृती अत्यंत धर्मविरोधी असून यापुढे मंदिर खुली केली नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मयुद्धासाठी तयार व्हावे, राज्यभर आता मागणी नाही आणि विनंती नाही तर धर्म युद्ध आणि तांडव करण्यात येईल असा इशारा भोसले यांनी दिला.
If temple are not opened, there will be Yadav all over the state. Chief Minister should be ready for religious war, warning of BJP’s spiritual front
महत्त्वाच्या बातम्या
- लाईफ स्किल : कष्टाला संयमाचाही जोड द्या, यशाच्या मार्गावर चालताना सावधगिरी बाळगा
- काबूल विमानतळाजवळ क्षेपणास्त्रे उडाली, हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ला केला अयशस्वी
- तिसरी लाट थोपविण्यासाठी दीड लाख आयसीयू बेड तयार ठेवा , निती आयोगाची सूचना
- मुबंईकरांसाठी खूषखबर, कोरोनाचा आलेख वेगाने लागला घसरू, पॉझिटीव्हीटी दर अवघा एक टक्यादहशतवर