वृत्तसंस्था
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात चार पोलीस स्टेशनमध्ये लाचखोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परंतु, त्यांना अटक करण्यापूर्वी 72 तासांची नोटीस देण्यात येईल, असे राज्य सरकारच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात स्पष्ट केले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. If Sameer Wankhede is to be arrested, we will give three days notice; Statement of State Government Advocates in Mumbai High Court
राज्य सरकार आपल्याला अटक करू शकते. त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन राज्य सरकारतर्फे वकिलांनी हायकोर्टासमोर समीर वानखेडे यांना 72 तासांची नोटीस देण्यात येईल आणि केस दाखल झाली तरच अटक करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
समीर वानखेडे सध्या आर्यन खान केस प्रकरणात तपास करत आहेत. आपल्याला या केस मधून बाजूला काढण्यासाठी काही कारस्थान रचण्यात येत असल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दिल्लीतल्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून केली आहे. परंतु, त्यांची आर्यन खान केस मधून बदली करण्यात येणार नाही, असे चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने स्पष्ट केले आहे.
आर्यन खानचा जामीन अर्ज देखील सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी साठी आहे. भारताचे माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यन खानच्या वतीने हायकोर्टात बाजू मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांची समांतर केस मुंबई हायकोर्टात आली आहे. त्यांच्या विरोधात लाचखोरीचे एकापाठोपाठ एक चार तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या अटकेची शक्यता वाटत आहे. आता त्यांना अटक करायचे झाल्यास 72 तासांची नोटीस मिळणार आहे.
If Sameer Wankhede is to be arrested, we will give three days notice; Statement of State Government Advocates in Mumbai High Court
महत्त्वाच्या बातम्या
- राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना कन्नडसक्ती नको , कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत
- कोरोना लसीकरणात मागास जिल्ह्यांमध्ये ‘हर घर दस्तक’ केंद्र सुरू होणार
- शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याकडून केली ७५ कोटींची मागणी , मानसिक छळाचा केला आरोप
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतायत; सोनारपूर नगरपालिका क्षेत्रात आजपासून तीन दिवसांचा लॉकडाऊन