• Download App
    नारायण राणे यांच्या "कानाखालीने" जर बदनामी होते, तर उद्धव ठाकरेंच्या "थपडेने" काय होते??; विजया रहाटकर यांचा महाराष्ट्र पोलिसांना रोकडा सवाल If Narayan Rane's "under the ear" is infamous, then what happens to Uddhav Thackeray's "slap"?

    नारायण राणे यांच्या “कानाखालीने” जर बदनामी होते, तर उद्धव ठाकरेंच्या “थपडेने” काय होते??; विजया रहाटकर यांचा महाराष्ट्र पोलिसांना रोकडा सवाल

    प्रतिनिधी

    संभाजीनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कानाखाली मारण्याचे वादग्रस्त वक्तव्य केले त्यावरून मुख्यमंत्र्यांची बदनामी झाली म्हणून नारायण राणे यांना अटक केली. परंतु, याच मुख्यमंत्र्यांनी जेव्हा, “अशी थप्पड मारून की परत उठणार नाही”, असे काहीच दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. तेव्हा “ते” काय होते? त्याने कुणाची बदनामी झाली नाही का?, असा रोकडा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी केला आहे. If Narayan Rane’s “under the ear” is infamous, then what happens to Uddhav Thackeray’s “slap”?

    आपल्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. मुंबईतील शिवसेना भवनावर कथित स्वरूपात हल्ल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या होत्या. त्यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने थपडेची भाषा ही वापरण्यात आली होती.

    त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, “थपडांची भाषा मला शिकू नका. आम्ही अशी एक थप्पड देऊ की परत उठणार नाही. हा शिवसैनिकांच्या रक्तातला गुण आहे”, अशी फुशारकी मारली होती.

    त्यावरूनच विजया रहाटकर यांनी “ती” बदनामी नव्हती का?, असा रोकडा सवाल महाराष्ट्र पोलिसांना केला आहे.

    If Narayan Rane’s “under the ear” is infamous, then what happens to Uddhav Thackeray’s “slap”?

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा