• Download App
    शिवसेनेचे मंत्री अनिल परब "निर्भीडपणे" ईडीकडे... मग राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, हसन मुश्रीफ का घाबरताहेत? । I am going to the ED office today, I will cooperate. I've not done anything wrong: Shiv Sena leader & Maharashtra Minister Anil Parab

    शिवसेनेचे मंत्री अनिल परब “निर्भीडपणे” ईडीकडे… मग राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, हसन मुश्रीफ का घाबरताहेत?

    वृत्तसंस्था

    मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीला सामोरे जाण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती अनिल परब आज सक्तवसुली संचालनालय ईडीला सामोरे जात आहेत. I am going to the ED office today, I will cooperate. I’ve not done anything wrong: Shiv Sena leader & Maharashtra Minister Anil Parab

    मी कोणताही गुन्हा केलेला नाही. ईडीने मला समन्स पाठवले आहे. त्यांना मी चौकशी आणि तपासात सहकार्य करेन. मी त्यांच्या कार्यालयात जातो आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सोशल मीडियात शिवसेनेचे मंत्री अनिल परब हे निर्भीडपणे ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ शकतात, तर राष्ट्रवादीचे शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावे लागलेले राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि सध्याचे राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ हे ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी का घाबरत आहेत?, असा सवाल या निमित्ताने करण्यात येत आहे.

    अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी एकदा इकडे मुदत मागून घेतली होती. गणेशोत्सव झाल्यानंतर आपण ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ, असे अनिल परब म्हणाले होते. त्यानुसार ते आज ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. परंतु, अनिल देशमुखांना आत्तापर्यंत ईडीने पाच वेळा तरी नोटीस काढली आहे. तरी देखील अनिल देशमुख ईडीला एकदाही सामोरे गेले नाहीत. ते स्वतःही गेल्या महिना – दीड महिन्यात सार्वजनिक कार्यक्रमात बाहेर दिसलेले नाहीत. ते नेमके कोठे आहेत त्याची काहीही माहिती नाही. त्यांच्या घरावर नागपूरमध्ये दोनदा अधिकाऱ्यांनी छापे घातले. परंतु, त्यावेळी त्यांच्या पत्नी घरात असल्याचे सांगण्यात आले. अनिल देशमुख नेमके कोठे आहेत?, याची कुणालाही माहिती नाही.

    हसन मुश्रीफ यांना ईडीची नोटीस आल्यानंतर तब्येत बिघडल्याने ते मुंबई हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यामुळेच शिवसेनेचे मंत्री ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ शकतात पण राष्ट्रवादीचे मंत्री नेमके का घाबरतात याविषयी सोशल मीडिया वरून वेगवेगळी चर्चा सुरू आहे.

    I am going to the ED office today, I will cooperate. I’ve not done anything wrong: Shiv Sena leader & Maharashtra Minister Anil Parab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस