मुंबई : येत्या काळामध्ये मुंबई आणि मुंबई लगतच्या भागमध्ये डिझेल घरपोच दिले जाणार आहे.इंडियन ऑइलच्या मार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.इंडियन ऑईल कार्पोरेशन यांनी हमसफर इंडिया आणि ओमकारा लॉजिक कंपनीसोबत त्यासाठी भागीदारी केली आहे.Home delivery of diesel In the vicinity of Mumbai
आता इंडियन ऑइल एक अप्लिकेशन तयार करणार आहे. त्यामार्फत लोकांना मुंबईलगतच्या शहरांमध्ये डिझेल हे मोफत घरपोच दिले जाणार आहे. यावेळी गाडी चालकांनी म्हटले की अतिशय चांगली बाब आहे आणि यामुळे येण्या-जाण्याचा वेळही वाचेल. आम्ही त्याचवेळी दुसरे काम करू शकतो आणि आमचे डिझेल हि तेवढेच वाचेल. त्यामुळे हा उपक्रम चांगला आहे आणि याचा सर्वांना फायदा होईल.
- मुंबई लगतच्या भागात होम डिलिव्हरी डिझेल
- हमसफर इंडिया, ओमकारा लॉजिकसोबत भागीदारी
- इंडियन ऑइल एक अप्लिकेशन तयार करणार
- मुंबईलगत डिझेल हे मोफत घरपोच पोचणार
- वाहन चालकांकडून उपक्रमाचे स्वागत