• Download App
    शरद पवारांच्या नावे मंत्रालयात बदलीसाठी कॉल किंवा खंडणीचा कॉल करण्याची हिंमत होते, याचे गौडबंगाल काय?; कायदा व सुव्यवस्था आहे कुठे? Hoax call in the name of sharad pawar; question mark on law and order situation in Maharashtra

    शरद पवारांच्या नावे मंत्रालयात बदलीसाठी कॉल किंवा खंडणीचा कॉल करण्याची हिंमत होते, याचे गौडबंगाल काय?; कायदा व सुव्यवस्था आहे कुठे?

    • सोशल मीडियात जोरदार चर्चा

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचे मेंटॉर शरद पवार यांच्या नावे थेट मंत्रालयात बदलीसाठी कॉल करण्यात येतो. त्यावरून राज्यात खळबळ उडते. ही खळबळ तशीच असताना खुद्द शरद पवारांच्या जिल्ह्यातून म्हणजे पुण्यातून त्याच्या पुढचे प्रकरण बाहेर येते. शरद पवारांच्या नावे थेट पाच कोटींच्या खंडणीसाठी कॉल जातो यातून काही महत्त्वाचे प्रश्न समोर येत आहेत. या विषयावर सोशल मीडिया मध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. Hoax call in the name of sharad pawar; question mark on law and order situation in Maharashtra

    मूळात हे असले कॉल शरद पवारांच्या नावे करण्याची हिम्मत एखाद्या व्यक्तीची होते, याचे गौडबंगाल काय? पवारांच्या नावे असले गुन्हेगारी स्वरूपाचे कॉल करणे याचा नेमका अर्थ काय?, असे प्रश्न सोशल मीडियात काही नेटिझन्सनी उपस्थित केले आहेत.

    नुकतेच खंडणीचे प्रकरण थेट पोलीस महासंचालकांच्या नावाने गाजले आहे. महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणातच राजीनामा द्यावा लागला आहे. ईडीचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागले आहे. अशा स्थितीत त्यांचे बॉस शरद पवार यांच्या नावाने पाच कोटींची वसुली करण्यासाठी कॉल करण्यात येतो, याचा अर्थ काय घ्यायचा?, असा प्रश्न नेटिझन्सना पडला आहे.



    अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री बदलले. त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्री नेमले. त्यांचा मतदारसंघ आंबेगाव ़पासून चाकण पंचवीस – तीस किलोमीटरवरचे गाव आहे. तिथून शरद पवारांच्या नावाने कॉल करण्यात येतो. पाच कोटींची वसुली करण्यासाठी हा कॉल होतो. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था कोणत्या थराला पोहोचली आहे?, असा सवाल नेटिझन्स सोशल मीडियावर करत आहेत.

    अनेकांनी तर शरद पवार यांच्या नावाने असे दोन नंबरच्या धंद्याचे कॉल करतातच कसे, असा सवाल उपस्थित करून पवारांच्या राजकीय कारकिर्दीकडेच एक प्रकारे बोट दाखविले आहे.

    या कॉल प्रकरणी तीन जणांना अटक झाली असली तरी एकूण हे प्रकरण एवढे गंभीर आहे की महाविकास आघाडीचे मेंटॉर, देशातले जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाचा आणखी कशा प्रकारे गैरवापर होईल हे सांगता येत नाही, अशी चर्चाही नेटिझन्स सोशल मीडियावर करीत आहेत.

    Hoax call in the name of sharad pawar; question mark on law and order situation in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस