• Download App
    हिंगोली : औंढा नागनाथ नगरपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व, सेनगावमध्ये महाविकास आघाडीची सत्ता । Hingoli Shiv Sena dominates in Aundha Nagnath Nagar Panchayat, Maha Vikas Aghadi in Sengaon

    हिंगोली : औंढा नागनाथ नगरपंचायतीत शिवसेनेचे वर्चस्व, सेनगावमध्ये महाविकास आघाडीची सत्ता

    जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव या दोन्ही नगरपंचायतीच्या एकूण 34 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. काँग्रेस 6, तर भाजप 7 जागांवर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि वंचित बहुजन आघाडीने दोन जागांवर विजय मिळवित आपले खाते उघडलेय. Hingoli Shiv Sena dominates in Aundha Nagnath Nagar Panchayat, Maha Vikas Aghadi in Sengaon


    विशेष प्रतिनिधी

    हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव या दोन्ही नगरपंचायतीच्या एकूण 34 जागांपैकी 14 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. काँग्रेस 6, तर भाजप 7 जागांवर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि वंचित बहुजन आघाडीने दोन जागांवर विजय मिळवित आपले खाते उघडलेय. एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील दोन्ही नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने 34 पैकी 25 जागांवर विजय मिळवित भाजपला मात दिली आहे. औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवलेय, तर सेनगाव नगरपंचायतीत महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालेय.

    औंढा नागनाथ नगर पंचायत

    एकूण जागा – 17
    शिवसेना- 9
    काँग्रेस-4
    भाजप-2
    वंचित बहुजन आघाडी-2



    सेनगाव नगरपंचायत

    एकूण जागा- 17
    शिवसेना-5
    काँग्रेस-5
    भाजप-5
    राष्ट्रवादी काँग्रेस-2

    Hingoli Shiv Sena dominates in Aundha Nagnath Nagar Panchayat, Maha Vikas Aghadi in Sengaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!