• Download App
    मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 10 जणांनी गमावला जीव, अनेक गुरे बेपत्ता, अनेक घरे पाण्याखाली । Heavy Rain In Marathawada, 10 people died in last 48 hours, several cattle washed away

    मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर, 10 जणांनी गमावला जीव, अनेक गुरे बेपत्ता, अनेक घरे पाण्याखाली

    Heavy Rain In Marathawada : मुसळधार पावसाने महाराष्ट्रात कहर केला आहे. राज्याच्या विविध भागांत जीवित व आर्थिक हानी झाली आहे. या अतिवृष्टीत अनेकांनी आपले प्राणदेखील गमावले आहेत. राज्यातील मराठवाडा भागात गेल्या 48 तासांत अतिवृष्टी आणि पुरामुळे दहा जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक लोकांची घरे वाहून गेली आहेत. Heavy Rain In Marathawada, 10 people died in last 48 hours, several cattle washed away


    प्रतिनिधी

    औरंगाबाद : मुसळधार पावसाने महाराष्ट्रात कहर केला आहे. राज्याच्या विविध भागांत जीवित व आर्थिक हानी झाली आहे. या अतिवृष्टीत अनेकांनी आपले प्राणदेखील गमावले आहेत. राज्यातील मराठवाडा भागात गेल्या 48 तासांत अतिवृष्टी आणि पुरामुळे दहा जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक लोकांची घरे वाहून गेली आहेत.

    मराठवाडा विभागात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. याशिवाय 200 हून अधिक गुरे वाहून गेली आणि या भागात पावसामुळे अनेक घरांचेही नुकसान झाले. यामध्ये औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

    बीडमध्ये तीन, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू

    एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 48 तासांमध्ये या प्रदेशातील सहा जिल्ह्यांतून 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात बीडमधील तीन, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये प्रत्येकी दोन आणि जालना, नांदेड आणि लातूरमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. गुलाब चक्रीवादळामुळे, विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम पुढील 48 तास राज्यातील अनेक भागांत दिसून येईल.

    5 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, 12 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

    हवामान विभागाने महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या 5 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धुळे, नंदुरबार अशा इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    पाण्याची पातळी वाढल्यानंतर धरणाचे 18 दरवाजे उघडले

    दुसरीकडे, महाराष्ट्रातील मांजरा धरणाच्या लगतच्या भागात मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी धरणाचे सर्व 18 दरवाजे उघडले, बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये पुराचा धोका वाढला, तर काही जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    Heavy Rain In Marathawada, 10 people died in last 48 hours, several cattle washed away

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य