• Download App
    ना ओल्या दुष्काळाची चिंता, ना कोरड्या दुष्काळाची भीती, जाणून घ्या, पीएम मोदी लाँच करत असलेल्या पिकांच्या 35 नव्या वाणांबद्दल । No worries of wet drought, no fear of dry drought, know about PM Modi launched 35 new varieties of crops

    ना ओल्या दुष्काळाची चिंता, ना कोरड्या दुष्काळाची भीती; जाणून घ्या, पीएम मोदींनी लाँच केलेल्या पिकांच्या 35 नव्या वाणांबद्दल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेट दिली आहे. त्यांच्या हस्ते आज पिकांच्या 35 विशेष जाती राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात खुद्द पंतप्रधानांनी ट्विट करून या 35 जातींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे विशेष वाण भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) विकसित केले आहेत. यांच्या मदतीने आपण हवामान बदल आणि कुपोषणासारख्या गंभीर आव्हानांचा सामना करू शकू. No worries of wet drought, no fear of dry drought, know about PM Modi launched 35 new varieties of crops


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना भेट दिली आहे. त्यांच्या हस्ते आज पिकांच्या 35 विशेष जाती राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या आहेत. या संदर्भात खुद्द पंतप्रधानांनी ट्विट करून या 35 जातींची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे विशेष वाण भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICAR) विकसित केले आहेत. यांच्या मदतीने आपण हवामान बदल आणि कुपोषणासारख्या गंभीर आव्हानांचा सामना करू शकू.

    भारतात, अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. आयसीएआरने विकसित केलेल्या पिकाचे हे वाण अगदी वेगळे आहेत. या यादीमध्ये अशी अनेक पिके आहेत जे कोरडा दुष्काळ आणि ओला दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहेत. अशा परिस्थितीत ही नवीन वाणे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात आणि दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतात.

    या पिकांमध्ये दुष्काळ सहनशील हरभरा वाण, विल्ट आणि स्टेरिलिटी मोजेक प्रतिरोधक तूर, लवकर पिकणारे सोयाबीन वाण, रोग प्रतिरोधक तांदळाचे वाण आणि गहू, बाजरी, मका, चणे, क्विनोआ, कुटु, विंगड बीन आणि फॅबा बीन यांचा समावेश आहे. म्हणजेच, ही पिके शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यास मदत करतीलच, शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही खूप प्रभावी ठरतील.

    याशिवाय, पीएम मोदींनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस टॉलरन्स रायपूरच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले आणि कृषी विद्यापीठांना ग्रीन कॅम्पस पुरस्काराचे वितरण केले. कार्यक्रमादरम्यान पीएम मोदींनी शेतकऱ्यांनाही संबोधित केले.

    शेती आणि विज्ञानाचा सतत समन्वय आवश्यक

    पीएम मोदी म्हणाले की, २१ व्या शतकातील भारतासाठी शेती आणि विज्ञानाचा समन्वय वाढत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज यासंबंधी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. 35 नवीन पीक वाण देशातील आधुनिक विचारसरणीच्या शेतकऱ्यांना समर्पित केले जात आहेत आणि या पावलामुळे त्यांचे उत्पन्न निश्चितच वाढेल.

    पौष्टिक बियाण्यांवर आमचा भर : पंतप्रधान मोदी

    पीएम मोदी म्हणाले की, गेल्या 6-7 वर्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीशी संबंधित आव्हाने सोडवण्यासाठी प्राधान्याने केला जात आहे. आमचे लक्ष अधिक पौष्टिक बियाण्यांवर आहे, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, विशेषत: बदलत्या हवामानात पिकांनी तग धरणे महत्त्वाचे आहे.

    No worries of wet drought, no fear of dry drought, know about PM Modi launched 35 new varieties of crops

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मनीष सिसोदियांना धक्का, कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवली

    निवडणूक देशाची, पंतप्रधान निवडण्याची; पण बुडत्या विरोधकांना हौस स्थानिक अस्मितांच्या काड्यांवर तरंगण्याची!!

    सुनेत्राताई पवार बारामतीकरांच्या मना-मनातील सुनबाई – देवेंद्र फडणवीस