• Download App
    पावसाच्या धुमाकूळीने द्राक्ष, टोमॅटो भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान!!; उत्तर, मध्य पश्चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल |Heavy rain disturbed life in north, west, south Maharashtra

    पावसाच्या धुमाकूळीने द्राक्ष, टोमॅटो भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान!!; उत्तर, मध्य पश्चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल

    प्रतिनिधी

    नाशिक : गेले दोन दिवस ढगाळ हवामान आणि प्रचंड पाऊस असल्यामुळे उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून द्राक्ष व टोमॅटो भाजीपाला अक्षरशः संपूर्ण शेतात संपून गेला आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून काढणीला आलेली पिके शेतात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांपुढे उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.Heavy rain disturbed life in north, west, south Maharashtra

    विशेषत: द्राक्ष आणि टोमॅटो या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान कमी म्हणून की काय आज आणि उद्या असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे जिल्ह्यात तसेच पश्‍चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



    गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतमालावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    अरबी समुद्रामध्ये असलेली चक्रीय वातप्रणाली आणि कच्छपर्यंत निर्माण झालेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे मराठवाड्याचा काही भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये बुधवारी पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. औरंगाबादसह पुणे, मुंबई, नाशिकमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.

    उत्तरेकडील हवामान बदलामुळे तापमानात कमालीचा चढउतार होत आहे. त्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतमालावर किड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

    अरबी समुद्रामध्ये असलेली चक्रीय वातप्रणाली आणि कच्छपर्यंत निर्माण झालेली ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली. याचा प्रभाव उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अधिक होता.

    पालघर, धुळे, नंदूरबार, नाशिक येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला होता. तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता होती. यासोबतच मच्छिमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.

    सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत झालेल्या नोंदीनुसार माथेरामध्ये २० मिलीमीटर, नाशिकमध्ये १९ मिलीमीटर, अलिबागमध्ये २१ मिलीमीटर, डहाणूमध्ये ११.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुण्यातही दिवसभर पावसाचा जोर होता. थांबूनथांबून सरी कोसळत होत्या. रात्री ८.३० वाजेपर्यंत ३३.८ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली.

    पावसामुळे वैजापूर गारठले

    वैजापूर, शहर व ग्रामीण भागात बुधवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मागील दोन दिवसांपासुन थंडीचे प्रमाण वाढले असुन नागरिक थंडीचा अनुभव करत आहेत.

    बुधवारी वैजापूर शहराचे किमान तापमान १५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. ग्रामीण भागात बहुतेक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे.

    Heavy rain disturbed life in north, west, south Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस