विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता मुंबईमध्ये एकही कन्टेनमेंट झोन नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. Heartening news: Not only Dharavi but the whole of Mumbai won the fight, the whole of Mumbai Entertainment Zone Free!
आतापर्यंत अंधेरीत 2 कन्टेनमेंट झोन होते, ते देखील रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले आहे. असे असले तरीही धोका अद्याप टळलेला नाही. मुंबईच्या काही भागात अद्यापही इमारती सील आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं आवश्यक आहे.
मुंबई कंटेनमेंट झोन फ्री झाली असली तरी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान मुंबईत आता एकही कंटेनमेंट झोन नसल्याने मोठा दिलासा मुंबईकरांना मिळाला.मुंबईत डेल्टा प्लसचा धोका वाढलाय मुंबईत आता 7 आणि आधीच्या 4 अशा 11 महिला डेल्टा प्लसने बाधित झाल्या आहेत.
त्यामुळे धोका वाढला आहे. या 11 महिलांपैकी 6 जणी कुलाबा वॉर्डातील आहेत, तीन घाटकोपर वॉर्डातील असून एक महिला कुर्ला वॉर्ड तर तर एक भायखळ्यातील आहे. दरम्यान 27 जुलै रोजी मुंबईत 63 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसने मृत्यू झाला होता, डेल्टा प्लसमुळे मुंबईतील हा पहिला तर राज्यातील तिसरा मृत्यू आहे. जिनोम सिक्वेन्सीन्गमुळे हा डेल्टाचा मृत्यू असल्याची माहिती समोर आली आहे.
Heartening news: Not only Dharavi but the whole of Mumbai won the fight, the whole of Mumbai Entertainment Zone Free!
महत्त्वाच्या बातम्या
- सुवर्णसंधी ! डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे पदभरती , असं करू शकता ऑनलाईन अप्लाय
- “शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, नाहीतर शिवसेनेचे २०२४ मध्ये खूप मोठे नुकसान होईल”,रामदास आठवलेंना इशारा
- INDIPENDANCE @75 : आठ वर्ष आठ फेटे ! कधी जामनगर कधी राजस्थानी नरेंद्र मोदींचा फिर भी दिल है हिंदुस्तानी ! साफे का सफर…
- स्वातंत्र्य दिन : टेक्सासमध्ये आयोजित केले कार्यक्रम , अमेरिकेचे राज्यपाल ग्रेग ॲबॉट यांनी या घोषणापत्रावर केली स्वाक्षरी