• Download App
    Hassan Mushrif : 158 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्यावर मुलगा जावयासह पुणे जिल्हा न्यायालयाची कारवाई सुरू!!|Hassan Mushrif: Pune District Court starts proceedings against Hasan Mushrif in money laundering case worth Rs 158 crore

    Hassan Mushrif : 158 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांच्यावर मुलगा जावयासह पुणे जिल्हा न्यायालयाची कारवाई सुरू!!

    प्रतिनिधी

    पुणे : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ त्यांचा मुलगा नावेद मुश्रीफ आणि जावई यांच्यासह नऊ आरोपींवर कंपनी कायद्याखाली कारवाई सुरू करा, असे आदेश पुणे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. गोसावी यांनी आज दिले आहेत.Hassan Mushrif: Pune District Court starts proceedings against Hasan Mushrif in money laundering case worth Rs 158 crore

    हसन मुश्रीफ यांनी शेल कंपनी स्थापन करून शेकडो कोटींचा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात केंद्रीय तपास संस्थांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मुश्रीफ यांनी 158 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याची कागदपत्रे त्यांनी सक्तवसुली संचालनालय तसेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिली होती.



     

    या संदर्भातली केस पुणे जिल्हा न्यायालयात पोहोचली आहे. या केसची दखल घेऊन पुणे जिल्हा न्यायाधीश गोसावी यांनी एकूण 9 आरोपींविरुद्ध कंपनी कायदा कलम 447 आधारे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे याच्या या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 मे रोजी घेण्याचे देखील निर्देश न्यायाधीशांनी दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलवर 158 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग संदर्भातली मुश्रीफ यांची केस आणि त्या संदर्भातला निकाल शेअर केला आहे.

    Hassan Mushrif: Pune District Court starts proceedings against Hasan Mushrif in money laundering case worth Rs 158 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!