बालदिनानिमित्त देशभरातून लहान मुलांना या बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.Happy Children’s Day by Raosaheb Danve
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची आज जंयती आहे .जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडायची त्यामुळे नेहरूंच्या जयंतीनिमित्त हा दिवस बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.बालदिनानिमित्त देशभरातून लहान मुलांना या बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
दरम्यान बालदिनानिमित्त केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील या बालदिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या दोन नातींना कडेवर घेत त्यांनी एक फोटो व्हायरल केला आहे. शुभेच्छा देताना दानवे म्हणाले की , “बाल-गोपालांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप मोठे व्हा, चांगल नाव कमवा, खेळा, अभ्यास करा आणि स्वतः बरोबर देशाचेही उज्वल भविष्य घडवा” , अशा शब्दांत त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.
रावसाहेब दानवे हे कुटुंबात नेहमी रमलेले दिसत असतात. त्यामुळे कोणताही सण किंवा उत्सव असला की ते आपल्या नातींबरोबर वेळ घालवतात.रावसाहेब दानवेंचा मुलगा आमदार संतोष दानवे यांना युवराज्ञी आणि वसुंधरा अशा दोन मुली आहेत.
नातीचा बालहट्ट पुरवतांना दुकानात जाऊन त्यांना खेळणी, बाहुली खरेदी करून देतांना देखील दानवे अनेकदा दिसले.आजोबा रावासाहेब दानवे दिल्लीहून भोकरदनला आले की आपल्या नातींसोबत खेळतात.आज बाल दिनानिमित्त देखील त्यांनी आपल्या नातीसोबतचे सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत देशभरातील लहान मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Children’s Day by Raosaheb Danve
- सीरमचे आरोग्य मंत्रालयाला आवाहन, कोवोव्हॅक्सला निर्यातीची मान्यता मिळाली नाही तर एक कोटी डोस वाया जातील
- मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी, दुबईहून आला थ्रेट कॉल
- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले – राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये ; अशा माथेफिरु प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे
- सीरमचे आरोग्य मंत्रालयाला आवाहन, कोवोव्हॅक्सला निर्यातीची मान्यता मिळाली नाही तर एक कोटी डोस वाया जातील