बोदवडला एका जाहीर सभेला संबोधताना मंत्री पाटील यांनी धरणगावातील रस्त्यांचा दाखला देताना ‘जर धरणगावात हेमामालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा देईन’ असे व्यक्तव्य केले होते.Gulabrao Patil apologizes for his statement about Hemamalini
विशेष प्रतिनिधी
जळगाव : अभिनेत्री हेमामालिनीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटीलांवर सगळीकडून टीका होऊ लागल्याने अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की , ” माझ्या बोलण्याचा उद्देश वाईट नव्हता, आम्ही छत्रपती शिवरायांना मानणारा मावळा आहे.तरी माझ्या बोलण्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले
नेमक काय म्हणाले गुलाबराव पाटील
बोदवडला एका जाहीर सभेला संबोधताना मंत्री पाटील यांनी धरणगावातील रस्त्यांचा दाखला देताना ‘जर धरणगावात हेमामालिनीच्या गालासारखे रोड नसले तर राजीनामा देईन’ असे व्यक्तव्य केले होते. गुलाबराव पाटील म्हणाले होते की , ”
माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे की त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला.मी हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते केलेत.
Gulabrao Patil apologizes for his statement about Hemamalini
महत्त्वाच्या बातम्या
- हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते केले म्हणणारे गुलाबराव पाटील तोंडावर पडले, जोरदार टीकेनंतर मागितली माफी
- सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ जगले असते तर गोवा पोर्तुर्गिजांच्या राजवटीतून आधीच स्वतंत्र झाल असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत
- वाह मंत्रीजी ! विद्यार्थीनीने केली तक्रार; चक्क मंत्र्याने केले शौचालय साफ ; प्रद्युम्न सिंग तोमर यांचे कौतुक
- नेहरू जी कह गए इंदिरा से ऐसा पोता आएगा, कैम्पेन करेगा कांग्रेस की और भाजपा को जितवाए, भाजप प्रवक्त्याच्या गाण्यावर कॉँग्रेसवाल्यांनाही हसू