• Download App
    राज्यपाल कोश्यारींचा शिवसेनेला मोठा धक्का, BMCच्या 'आश्रय योजने'च्या चौकशीचे आदेश । Governor Koshyari's big blow to Shiv Sena, orders inquiry into BMC's 'Ashray Yojana'

    राज्यपाल कोश्यारींचा शिवसेनेला मोठा धक्का, BMCच्या ‘आश्रय योजने’च्या चौकशीचे आदेश

    बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रय योजनेवरून ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेला मोठा दणका देत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीएमसीच्या “आश्रय योजनेच्या” चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसीच्या आश्रय योजनेत १ हजार ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. Governor Koshyari’s big blow to Shiv Sena, orders inquiry into BMC’s ‘Ashray Yojana’


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रय योजनेवरून ठाकरे सरकारला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेला मोठा दणका देत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बीएमसीच्या “आश्रय योजनेच्या” चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या लोकायुक्तांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसीच्या आश्रय योजनेत १ हजार ८०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

    बीएमसीच्या आश्रय योजनेत घोटाळा?

    बीएमसीच्या ‘आश्रय योजने’बाबत भाजपच्या आरोपांनुसार, सीव्हीसी (केंद्रीय दक्षता आयोग) नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. नियमानुसार, एखाद्या निविदेत केवळ एकच सहभागी झाला, तर निविदा परत मागवल्या पाहिजेत, मात्र तसे झालेले नाही. आश्रय योजनेअंतर्गत बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधली जात होती.



    1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

    BMC आणि शिवसेनेने मिळून 1800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार केली होती आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लोकायुक्तांकडे करण्यात आली होती.

    Governor Koshyari’s big blow to Shiv Sena, orders inquiry into BMC’s ‘Ashray Yojana’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू

    Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध