• Download App
    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : शिवसेनेच्या व्हीपच्या लढाईत राज्यपालांची एन्ट्री??; ज्येष्ठ सदस्याचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवणार??|Governer may suggest senior member's name to preside over the functioning of maharashtra legislature

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक : शिवसेनेच्या व्हीपच्या लढाईत राज्यपालांची एन्ट्री??; ज्येष्ठ सदस्याचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवणार??

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाचा आदेश मानण्यास नकार!!; उलट ठाकरे गटाला लावला आपला व्हीप


    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावा आधी विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने राजन साळवी, तर भाजपने राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर राजन साळवी यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला आहे. शिंदे गटालाही तो व्हीप लागू होत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. पण शिवसेनेचा हा दावा आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. शिवसेनेच्या व्हीपला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने देखील ठाकरे गटाच्या 16 आमदारांना व्हीप जारी केला आहे.Governer may suggest senior member’s name to preside over the functioning of maharashtra legislature

    ही लढाई टोकाची आणि कायदेशीर बनल्यामुळे यामध्ये राज्यपालांची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. राज्यपाल विधानसभेच्या एका ज्येष्ठ नेत्याचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवून त्यांच्या अध्यक्षतेखाली विश्वास दर्शक ठरावाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची शक्यता आहे. कदाचित अशी विनंती शिंदे फडणवीस सरकार राज्यपालांना करण्याची शक्यता आहे.



    आम्हाला व्हीप लागू नाही

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार हे गोव्यातून मुंबईकडे येण्यासाठी रवाना झाले त्यावेळी गोवा विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्याकडे दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीप लागू होत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

    शिवसेनेकडून व्हीप जारी

    विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात रविवारी अध्यक्षपदासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे आपले उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी शिवसेनेने व्हीप जारी करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी तसे आदेश दिले आहेत.

    अपात्र व्हायचं नसेल तर…

    शिंदे गटातील आमदारांनाही हा व्हिप लागू होत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांना जर आमदार म्हणून अपात्र व्हायचं नसेल तर त्यांना मतदान हे मलाच करावं लागेल, असे शिवसेनेचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार राजन साळवी यांनी सांगितले.

    परंतु आता दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेचा व्हीप एकनाथ शिंदे गटाला लागू होणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे ही लढाई आता कायदेशीर पातळीवर पोहोचणार आहे. उद्या विधानसभेत नेमके काय होते? एकनाथ शिंदे यांचा गट अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाला मतदान करतो? त्याचबरोबर त्यांचे मतदान वैध धरले जाईल की अवैध हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर मूळात एकनाथ शिंदे गट हा विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करेल ही आयत्या वेळेला तटस्थ राहून भाजप आणि अपक्षांच्या मदतीने राहुल नार्वेकर यांना निवडून आणेल आणि नंतर आपल्या सरकारच्या शक्तिपरीक्षेला सामोरा जाईल हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

    मात्र राज्यपालांनी हस्तक्षेप करून ज्येष्ठ सभासदाचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले तर या संघर्षातून तोडगा निघून विधानसभेचे कामकाज विश्वास दर्शक ठरावापुरते सुरळीत चालू शकते, असे मत माजी विधिमंडळासाठी अनंत कळसे यांनी व्यक्त केले आहे.

    Governer may suggest senior member’s name to preside over the functioning of maharashtra legislature

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस