विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : आम्हाला अनपेक्षितपणे सत्ता मिळालेली आहे. उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असे मला कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्र्यांने सांगितले असल्याचे खळबळजनकदावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.Got power unexpectedly! Even if Uddhav Thackeray slaps him in the mouth, he will not leave the government, Chandrakant Patil alleges on senior minister
पाटील म्हणाले, कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री मला असे म्हणाले की, इतक्या अनपेक्षितपणे आम्हाला सत्ता मिळाली आहे. याची आम्हाला कल्पनाही नव्हती. उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही. एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी्य
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून मुंबई आणि पुण्यातील बलात्काराच्या वाढत्या घटना पाहता राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्टपणे जाणवते. कोणाला कायद्याचा धाक राहिलेला नाही. बलात्कार करणाऱ्या लवकर अटक होत नाही, झाली तर दोन दिवसात जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे मनोबल वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घातले पाहिजे, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यकत केली.
खालच्या कोर्टात दोषारोप सिध्द झाले नाहीत म्हणून भुजबळ आणि राष्ट्रवादी पेढे वाटत आहेत. ढोल बडवत आहे. याचवेळी त्यांची मुंबईतील १०० कोटींची बेनामी इमारत जप्त झाली त्याचे काय? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
Got power unexpectedly! Even if Uddhav Thackeray slaps him in the mouth, he will not leave the government, Chandrakant Patil alleges on senior minister
महत्त्वाच्या बातम्या
- आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
- भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
- लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश
- वर्क फ्रॉम होम नको रे बाप्पा..! तातडीने वर्क फ्रॉम ऑफिस सुरु न केल्यास लग्न टिकणारच नसल्याने कर्मचार्याच्या पत्नीचे उद्योगपतीला साकडे