आपण मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरित आपला मुलगा आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याच तत्परतेने महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना त्यासाठी हात जोडू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.Gopichand Padalkar’s letter to the Chief Minister,Solve the issue of appointment of Bahujan youth
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्वरित आपला मुलगा आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याच तत्परतेने महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा,
अशी मागणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांना त्यासाठी हात जोडू नका, असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलच्या पत्रात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा आरक्षण रद्द झाले, ही वेदनादायी बाब आहे, यामुळे कधीही भरून न निघणारी जखम मराठा समाजाला झाली आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्याने सरकारी भरती प्रक्रिया, शिक्षण क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिया यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठा समाजातील तरुणांसोबत आता इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे.
मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवगार्तून निवडून आलेल्या 76 विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचं काय करायचं? इतर सर्व मागासवर्गीय प्रवगार्तील 365 युवकांना अजून नियुक्ती नाही.
यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. याचा उद्रेक झाल्यास महाविकास आघाडी सरकारच पाप ठरेल, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
नियुक्त्यांचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पडळकर यांनी पत्रात केली आहे.
Gopichand Padalkar’s letter to the Chief Minister,Solve the issue of appointment of Bahujan youth