• Download App
    Golden opportunity!  Mega recruitment in the state public health department, recruitment of 3466 posts

    बेरोजगारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेगा भरती, 3466 पदांची भरती

    कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला असून याला शासनाचा आरोग्य विभागसुद्धा अपवाद नाही. वाढती रुग्णसंख्या आणि रिक्त पदं यांचा मोठा ताण आरोग्य विभागावर आल्याचं पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही सरकारी नोकरी म्हणजे एक सुवर्णसंधी म्हणता येईल. Golden opportunity!  Mega recruitment in the state public health department, recruitment of 3466 posts


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूने कहर केला. त्यामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले. याचा मोठा परिणाम उद्योग क्षेत्रावर झालेला दिसून येतो. दरम्यान रोजगार आणि नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. सध्या अनेक युवक रोजगार किंवा नोकऱ्यांच्या शोधात आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि रिक्त पदं यांचा मोठा ताण आरोग्य विभागावर आल्याचं पाहायला मिळतंय.

    याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही सरकारी नोकरी म्हणजे एक सुवर्णसंधी म्हणता येईल.



    या पदभरती प्रक्रियेबाबतचं वृत्त ‘टीव्ही नाइन’ने दिलं आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ग्रुप डीमध्ये पदभरतीची घोषणा करण्यात आली आहे. यात एकूण 3466 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 7 ऑगस्ट 2021 पासून सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

    ग्रुप डीच्या पदांकरिता उमेदवाराची पात्रता

    1) अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांसह इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेला असावा.

    2) उमेदवाराचं वय 21 ते 39 वर्षांदरम्यान असावं.

    3) आरक्षणानुसार आरक्षित वर्गातील उमेदवारांना सूट देण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

    असा करू शकता अर्ज

    या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या groupc.arogyabharti2021.in या अधिकृत वेबसाइटवर जावं.

    नंतर वेबसाइटच्या होम पेजवरच्या Vacancy Matrix या लिंकवर क्लिक करावं.

    त्यानंतर पदाशी संबंधित लिंकवर क्लिक करावं.

    पुढे त्यावर मागितलेली माहिती भरून नोंदणी करावी.

    नोंदणी झाल्यावर उमेदवार ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात.

    Golden opportunity!  Mega recruitment in the state public health department, recruitment of 3466 posts

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा