• Download App
    तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे ,सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही - किरीट सोमय्याGoing to jail means taking action, not everyone can be put in jail - Kirit Somaiya

    तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे ,सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही – किरीट सोमय्या

    पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून किरीट सोमय्या यांनी यु-टर्न घेतला आहे.Going to jail means taking action, not everyone can be put in jail – Kirit Somaiya


    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे काल पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते.यावेळी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून किरीट सोमय्या यांनी यु-टर्न घेतला आहे.


    शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला १०० कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप


    किरीट सोमय्या यांना पत्रकार परिषदेत ”अजित पवार यांना तुरूंगात टाकणार, अशी टीका आपण करता. त्यांना अजून काही तुरूंगात टाकले नाही. भाजपचाच अजित पवारांना पाठिंबा आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता.

    यावेळी उत्तर देताना सोमय्या म्हणाले की , ”तुरुंगात जाणार या वक्तव्याकडे शब्दप्रयोग म्हणून पाहावे. तुरुंगात जाणे म्हणजेच कारवाई होणे आणि अशी कारवाई झाल्यावर तुम्ही माझं कौतुक तरी करा, उपमुख्यमंत्री अजित पवार तुरुंगात जाणार हा एक शब्दप्रयोग आहे. सर्वांना तुरुंगात टाकणं शक्य नाही, ‘ असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

    Going to jail means taking action, not everyone can be put in jail – Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shambhuraj Desai : खासदारांचे विलीनीकरण पूर्णपणे घटनात्मक; ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तर

    Prakash Ambedkar : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; वंचितकडून 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

    Uddhav Thackeray : जंतरमंतरवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंची हजेरी; म्हणाले- देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका