विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात नावलौकिक असणाऱ्या कुसेगाव (ता.दौंड) येथील श्री भानोबा देवाच्या यात्रेत निघणाऱ्या पालखी सोहळ्याच्या देव-दानव युद्ध झाले. या खेळात पहिल्या दिवशी ९३४ गडी बेशुद्ध पडले होते.god-demon The thrill of war at pune
राज्यभरातून अनेक भाविक भक्त यावेळी हे युद्ध पाहण्यासाठी आले होते.दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत यवत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.पुणे जिल्ह्यातील कुसेगाव येथे सोमवारी (ता.२०) रोजी देव-दानव युद्धाचा थरार पाहायला मिळाला.
भानोबा देवाच्या यात्रेत बोल भानोबाचं. चांगभलं. म्हणत भाविकांनी कुसेगाव (ता.दौंड) येथे भानोबा देवाचे मोठ्या भक्तीमय वातावरणात दर्शन घेतले.यात्रेच्या पहिल्या दिवशी भानोबा देवाच्या गाव प्रदक्षिणेच्या वेळी देव-दानव यांच्या प्रतिकात्मक युद्ध झाले. रणभूमीवर दानवांचे मुडदे पडले.
श्री क्षेत्र कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे.भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक,ओलांडा,पोवाडा,कुस्त्या,लोकनाट्य आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला आहे.
भानोबा देव हे (कोयाळी,ता.खेड) येथे दुष्काळ असल्यामुळे (मंगळवेढा,जि.सोलापूर) येथे आपली गुरे चरण्यासाठी गेले असता तेथे रामोशी व मातंग समाज यांच्यामध्ये घनघोर युद्ध होऊन भानोबा देवाचा येथे वध करण्यात आला,असा पुराणात उल्लेख आहे.
तसेच जुने जाणकारही सांगतात. याचाच बदला म्हणून या यात्रेत रामोशी व मातंग समाज बांधवांमध्ये भानोबा देवाच्या यात्रेच्या पालखी सोहळ्यात प्रतिकात्मक युद्ध केले जाते. युद्धभूमीवर प्रतिकात्मक मुडदे पडतात. युद्धभूमीवर पडणाऱ्या व्यक्ती तब्बल दोन तास बेशुद्धावस्थेत असते. यावेळी भानोबा देवाचा घाम बेशुद्ध पडणाऱ्या व्यक्तिवर टाकून कानामध्ये भानोबाचं चांगभलं बोललं जातं.तेव्हा कुठे बेशुद्ध व्यक्ती शुद्धीवर येत असते.
- चक्क देव-दानव युद्धाचा थरार
- भानोबा यात्रेसाठी लाखो भाविक आले
- पुण्याच्या कुसेगावात लुटुपुटूची लढाई
- पालखी सोहळ्यात देव-दानव यांचे प्रतिकात्मक युद्ध
- खेळात पहिल्या दिवशी ९३४ गडी बेशुद्ध पडले
god-demon The thrill of war at pune
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर परिसीमन आयोगाची बैठक, प्रस्तावानुसार विधानसभेच्या 7 जागा वाढणार; पाकव्यात काश्मिरासाठी 24 जागा राखीव
- अशोक चव्हाणांना मोठा हादरा, देगलूर बाजार समितीवर भाजपची एकहाती सत्ता
- श्रीलंकेच्या नौदलाने ४३ भारतीय मच्छिमारांना केले अटक ; सहा बोटीही घेतल्या ताब्यात
- चार वर्षाखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देऊ नका; केंद्र सरकारचा आदेश
- मतदार कार्ड आधारशी जोडण्यास असदुद्दीन ओवैसींचा विरोध, म्हणाले- हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात!